आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट कोहलीला मिळाला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार, अभिमानाने पाहतच राहिली अनुष्का

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: मंगळवारी 25 सप्टेबर रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रीय क्रिडा पुरस्कारांचे वितरण झाले. या दरम्यान भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार मिळाला. अवॉर्ड सेरेमनी दरम्यान विराट कोहलीची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा, कोहलीचे नाव अनाउंस होताच, त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. तिच्या नजरा विराटवरुन हटल्या नाहीत.

 

अनुष्काचा साधेपणा सर्वांनाच आवडला 
अनुष्का अवॉर्ड सेरेमनीमध्ये सिंपल लूकमध्ये आली. ती ब्लॅक आणि गोल्ड कॉम्बिनेशनली साडी नेसून आली. अनुष्कासोबत विराटची आई सरोज कोहलीसुध्दा होत्या. या सोहळ्यानंतर अनुष्का आणि विराटसोबत इतर विजेत्यांनीही फोटो सेशनमध्ये भाग घेतला. 

 

अवॉर्ड मिळवणारा विराट तिसरा क्रिकेटर 
कोहलीपुर्वी हा अवॉर्ड फक्त दोन क्रिकेटर्सला मिळाला आहे. यामध्ये महेंद्र सिंह धोनी(2007) आणि सचिन तेंडुलकर (1997) यांचा समावेश आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये विराटच्या नावाची चर्चा 2016 मध्ये झाली होती. परंतू तेव्हा विराटला निवडण्यात आलेले नव्हते.
 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

बातम्या आणखी आहेत...