आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्माती म्हणून आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल अनुष्का म्हणाली, 'सर्वांनी मला निर्मिती क्षेत्रात पदार्पण करू नकोस असे सांगितले होते'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद : अनुष्का शर्मा अभिनित ‘एनएच 10’ चित्रपटाच्या प्रदर्शनाला पाच वर्षे पूर्ण, निर्माती म्हणून पदार्पण करणारी अनुष्का शर्मा सांगतेय तिच्या या प्रवासाबाबत...

अनुष्का अवघ्या 25 व्या वर्षी निर्माती झाली. तिच्यानंतर बॉलीवूडमधील बऱ्याच अभिनेत्रीदेखील निर्मिती क्षेत्रात आल्या. प्रियांका चोप्रा ‘बम बम बोल रहा है काशी’ आणि ‘व्हेंटिलेटर’ सारख्या चित्रपटांची निर्मिती केली. चित्रांगदा सिंहने ‘सूरमा’बनवला. दीपिका पादुकोणने ‘छपाक’ची निर्मिती केली, तर कंगना रनोट मागच्या वर्षी निर्माती झाली.

‘या ‘चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय मी अगदी सहज घेतला. यातून काही वेगळे दाखवण्याचा आिण प्रेक्षकांचे मनोरंजन झाले पाहिजे असे मला मनापासून वाटले. एक निर्माती म्हणून प्रेक्षकांना मला वेगळे काही तरी द्यावयाचे होेते आणि मला विश्वास होता की, अशा चित्रपटाच्या माध्यमातून मनोरंजनाला मी नवीन रंग, रूप देऊ शकते. मी नेहमी चांगल्या कथानकाच्या शोधात असते. एक कलाकार म्हणून माझ्या करिअरमध्ये नेहमी जोखीम असणाऱ्या नवीन संकल्पनांचे समर्थन केले आहे आिण माझ्याकडे ‘एनएच १०’सारखा चित्रपट आला तर मी एक निर्माती म्हणून प्रेक्षकांसाठी वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाची जोखीम घ्यायला तयार झाले. त्यावेळी मी 25 वर्षांची होते आणि चित्रपट निर्मितीसंबंधी काहीच ज्ञान नव्हते. परंतु, प्रेक्षकांना काय द्यायचे हे मला आिण माझा भाऊ कर्णेशला ठाऊक होते. मी स्टीरिययोटाइप्ट नॉन-मेनस्ट्रीम चित्रपटाला मेनस्ट्रीम चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी जशा संकल्पनेवर आधारित चित्रपट तयार केला होता तशाच संकल्पनेवर आधािरत चित्रपटाची निर्मिती आता भारतात होणार असल्याचे दिसत आहे. त्यावेळी घेेतलेला माझा निर्णय योग्य वाटतो. त्यावेळी जवळपास सर्वांनी निर्मिती क्षेत्रात येऊ नको म्हणून सांगितले होते आिण एक अभिनेत्री म्हणून एकाच ठिकाणी लक्ष केंद्रित कर असा सल्लाही दिला होता. याकडे मी लक्ष दिले नाही, परंतु यामुळे माझा निश्चय अधिक दृढ झाला. कर्णेश आिण मी ज्या प्रकाराच्या संकल्पनेची निर्मिती केली आहे त्यावर मला गर्व आहे आणि आमच्याकडे आणखी एक कुतुहल निर्माण करणारे कथानक असून ते प्रदर्शित करण्यासाठी आम्ही खूप उत्सुक आहोत. बऱ्याच कलाकारांना निर्माता झालेले पाहून मी आनंदी आहे. भारतातील चित्रपटांची पार्श्वभूमी बदलण्यासाठी आपणा सर्वांना एकत्रितपणे योगदान देण्याची गरज आहे असे मला वाटते.’