आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​वरुणचे चॅलेंज पुर्ण करु शकला नाही अक्षय कुमार, 11 वेळा प्रयत्न करुनही झाला फेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क: बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा अभिनयात खुप पुढे आहे, यासोबतच तो अॅक्शनमध्येही सर्वात पुढे आहे. परंतु फिजिकली-मेंटली स्टाँग अक्षय कुमार वरुण धवनचे एक सोपे चॅलेंज पुर्ण करु शकला नाही. वरुणचे हे चॅलेंज पुर्ण करण्यासाठी अक्षयने 11 वेळा प्रयत्न केला. परंतू तो फेल झाला. शेवटी अक्षय म्हणाला की, यापेक्षा तु माझ्याकडून बिल्डिंगवरुन जंप मारु घेतली असती. 


काय होते वरुणचे चॅलेंज 
वरुण धवन आणि अनुष्का शर्माने एक व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये ते सुईमध्ये दोरा ओवताना दिसत आहेत. ते हा टास्क पुर्ण करतात, तेव्हा व्हिडिओ पाहणा-यांना म्हणतात की, तुम्ही हे चॅलेंज पुर्ण करु शकता का? या व्हिडिओनंतर अक्षयने वरुणचे चॅलेंज एक्सेप्ट केले आणि नंतर सुईमध्ये दोरा ओवण्यासाठी बसला. परंतू त्याने 11 वेळा प्रयत्न करुनही तो काम पुर्ण शकला नाही. शेवटची अक्षयने हार मानली. अक्षयने टास्क पुर्ण करण्याचा प्रयत्न करत एक व्हिडिओ बनवला. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ वरुण धवनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. वरुण धवन आणि अनुष्काचा 'सुई धागा' चित्रपट लवकरच रिलीज होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...