आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Anushka Sharma Virat Kohli Expresses Love In Different Way On Their Second Wedding Anniversary

अनुष्का-विराटने दुसऱ्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त व्यक्त केले प्रेम - 'दररोज प्रेमाची अनुभूती करून दिल्याबद्दल आभार'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. दोघांनी इटलीमध्ये 11 डिसेंबर 2017 ला लग्न केले होते. सेकंड वेडिंग अॅनिव्हर्सरीला दोघांनी आपल्या लग्नातील काही फोटो शेअर करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. विरुष्काच्या या पोस्ट्समध्ये प्रेम थोड्या वेगळ्या पद्धतीने व्यक्त केले गेले आहे.  

अनुष्काने वेडिंगचा फोटो शेअर करून लिहिले आहे, 'एखाद्या दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करणे देवाचा चेहरा पाहण्यासारखे आहे - व्हिक्टर ह्यूगो. प्रेम केवळ एक भावना नाहीये, हे त्यापेक्षाही जास्त आहे. हे एका मार्गदर्शक, एका प्रेरक आणि पूर्ण सत्याचा मार्ग आहे. आणि मी आभारी आहे की, मला खऱ्या अर्थाने हे मिळाले आहे.'  

तसेच विराटनेदेखील अनुष्का आणि आपला फोटो शेअर करून लिहिले आहे, 'वास्तविकल केवळ प्रेम आहे आणखी काही नाही. आणि जेव्हा देव तुम्हाला त्या व्यक्तीची साथ आशीर्वादाच्या स्वरूपात देतो जो तुम्हाला त्याची जाणीव करून देतो. तेव्हा तुमच्याकडे केवळ एक भावना असते, आभार.'  

बातम्या आणखी आहेत...