आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकसाठी झाली अनुष्का शर्माची निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'वॉर' चित्रपटाच्या यशानंतर हृतिक रोशन आता १९८२ मध्ये आलेल्या 'सत्ते पे सत्ता'च्या रिमेकवर काम करत आहे. हा चित्रपट फराह खान आणि रोहित शेट्टी सोबत मिळून बनवणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी बऱ्याच अभिनेत्रींची नाव समोर आले होती मात्र आता निर्मात्यांनी अनुष्का शर्माला यासाठी फायनल केले आहे. यापूर्वी या प्रोजेक्टसाठी दीपिका पदुकोन आणि कॅटरिना कैफचे नावदेखील समोर आले होते.

  • फराह स्वत: करणार घोषणा

सूत्राच्या माहितीनुसार..., हृतिक आणि अनुष्काची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे दोघेही पहिल्यांदाच पडद्यावर सोबत दिसतील. मात्र, अद्याप दोघांनी याबद्दल काहीच सांगितले नाही. कारण फराह स्वत: याची घोषणा करणार आहे. म्हणूनच या चित्रपटाशी संबंधित अभिनेते आणि सूत्रदेखील अधिकृतपणे काहीही बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.

  • शीर्षक असेल 'सेवेन'

या चित्रपटाचे शीर्षक सेवेन असे ठेवण्यात आल्याचे ऐकण्यात येत आहे. खरं तर, या चित्रपटाची कथा सात भावावर आधारित आहे. त्यामुळे असे शीर्षक देण्यात आले आहे. मूळ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि हेमा यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. तर इतर सहा भावांच्या भूमिकेत सुधीर, शक्ती कपूर, गूफी पेंटल, कंवलजीत सिंह, विक्रम साहू आणि सचिन दिसले होते. रोहित या चित्रपटाची निर्मिती करणार आणि मी याचे दिग्दर्शन करणार आहे. आम्ही जेव्हा सोबत काम करू तेव्हा या चित्रपटाची अधिकृत घोषणा करू. या दिवाळीवर आम्ही यावर चर्चा करू. मी फक्त रोहितची वाट पाहत आहे, कारण तो सध्या 'सूर्यवंशी' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. - फराह खान दिग्दर्शक

बातम्या आणखी आहेत...