आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इटलीत साताजन्माच्या गाठीत अडकले होते 'विरुष्का', बघा साखरपुडा, मेंदी, हळदीपासून ते लग्नापर्यंत हे खास क्षण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या लग्नाचा आज दुसरा वाढदिवस आहे. 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीत गुपचुप दोघांनी लग्न केले होते. इटलीत लग्न कुठे होणार, कोणकोणत्या सेलिब्रिटींना आमंत्रित केलं गेलं, मुंबईत रिसेप्शन होणार का, अशा एक ना अनेक गोष्टींची चर्चा त्यावर्षी झाली होती. विराट आणि अनुष्काच्या कुटुंबीयांनी त्यांच्या लग्नाबाबत कोणतीही माहिती समोर येऊ दिली नव्हती. लग्नानंतर विराट आणि अनुष्काने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ते विवाहबंधनात अडकल्याचे जाहीर केले होते. इटलीतील टस्कनी येथे हा विवाहसोहळा पार पडला होता. 
विराट कोहलीने ट्विट करत म्हटले होते, ‘आज आम्ही आयुष्यभर एकमेकांच्या प्रेमात राहण्यातचे वचन दिले. ही गोष्ट चाहते, मित्र- परिवारासोबत शेअर करताना अत्यानंद होत आहे. तुमच्या सदिच्छा अशाच आमच्या पाठिशी राहो. आमच्या आयुष्याचा महत्त्वपूर्ण भाग झाल्याबद्दल धन्यवाद.’
लग्नानंतर अनुष्का आणि विराट यांनी दोन वेडिंग रिसेप्शन दिले होते. दिल्ली आणि मुंबईत त्यांचे वेडिंग रिसेप्शन झाले होते.
अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांचे वेडिंग ड्रेसेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्ससाची यांनी डिझाइन केले होते. अनुष्का लाइट पिंक कलरच्या लहेंग्यात अतिशय सुंदर दिसली होती. तर विराटने लग्नात ऑफ व्हाइट कलरची शेरवानी परिधान केली होती. तर साखरपुड्याला विराट सूटमध्ये दिसला तर अनुष्कासाठी वेलवेटची रेड कलरची साडी डिझाइन करण्यात आली होती. मेंदी सेरेमनीत अनुष्काने डिझायनर ड्रेस परिधान केला होता. 
पाहुयात, चाहत्यांच्या लाडक्या विरुष्काचे वेडिंग अल्बममधील हे खास फोटोज...