आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकारण आणि क्रिकेटमध्ये काहीही घडू शकते : गडकरी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर : राजकारण आणि क्रिकेटमध्ये केव्हा काहीही घडू शकते, असे मी मुंबईच्या कार्यक्रमातच तीन-चार दिवसांपूर्वी बोललो होतो. माझ्या त्या वक्तव्याचे महत्त्व तुम्हाला आज पटलेले असेल, अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर बोलताना व्यक्त केली.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार या दोन्ही नेत्यांचे आपण मनापासून अभिनंदन करतो, असे सांगताना गडकरी म्हणाले की, अनेक दिवसांपासून सरकार कसे स्थापन होणार यावर महाराष्ट्रात चिंतेचे वातावरण होते. ते आता दूर झाले. त्यामुळे महाराष्ट्राचा विकास होईल. राज्यपालांनी सरकारला दिलेल्या मुदतीत बहुमत सिद्ध करतील आणि त्यांच्या नेतृत्वात राज्यात स्थिर सरकार मिळेल.

गडकरींना कल्पना होती


सत्तास्थापनेसाठी फडणवीस आणि अजित पवार यांच्यात गुप्त खलबते सुरू असताना याची पूर्ण कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना होती, असे त्यांच्या निकटवर्तीयांचे म्हणणे आहे. शुक्रवारी रात्रीपासून गडकरी हे सक्रिय दिसले, असे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. शनिवारी सकाळी पुट्टपर्थी येथे कार्यक्रमाला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर गडकरी यांनी शपथविधीची संपूर्ण माहिती घेतली, असेही त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
 

बातम्या आणखी आहेत...