आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारची सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास भेट, आपल्या मर्जीने घेऊ शकतात कुठेही ट्रांसफर...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लोकसभा निवडणुकांच्या आधी लोकांना आकर्षित करण्यासाठी मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खास भेट आणली आहे. आता प्रत्येक राज्यातील सरकार आपल्या कर्मचाऱ्यांची पगार वाढ करू शकते. केंद्रीय कर्मचाऱ्यांची मागणी होती की, त्यांच्या पगारात वाढ केली पाहिजे, यामुळेच राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याच्या दिशेने पुढे जात आहे. यासोबतच सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना अजून एक भेट दिली आहे, ज्याचा फायदा अडीच लाखंपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना होणार आहे.
 

हव्या त्या ठिकाणी ट्रांसफर मिळू शकते 
सरकारने ग्रामीण टपाल कर्मचाऱ्यांच्या सगळ्या श्रेणिंसाठी लिमिटेड ट्रांसफर सुविधेच्या सगळ्या विनंत्या मान्य केल्या आहेत. सध्या ग्रामीण टपाल कर्मचारी एकदाच ट्रांसफर घेऊ शकतात, तर महिला टपाल कर्मचारी दोन वेळस ट्रांसफर घेऊ शकतात. आता सरकारच्या नवीन नियमांनुसार कर्मचारी आपल्या मर्जीने कुठेही ट्रांसफर घेऊ शकतात. यासाठी कर्मचाऱ्यांना 3 वर्षे नोकरी केली पाहिजे. त्यासोबतच सगळ्या औपचारीकता पूर्ण कराव्या लागतील. तर यामध्ये कोणा कर्मचाऱ्यावर पोलिस केस असेल तर त्याला याचा फायदा घेता येणार नाही.  


केंद्रिय कर्मचाऱ्यांनी केली पगार वाढेची मागणी
केंद्रीय कर्मचाऱ्यांनी 8 हजार रूपयांपर्यंतच्या पगार वाढीची मागणी केली आहे. सध्या कर्मचाऱ्यांची कमाल पगार 18 हजार रूपये आहे, ज्याला वाढवून 26 हजार करण्याची मागणी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...