आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलच्या कमेंटने नाराज फेसबुकची कार्यालयात अायफाेन बंदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफाेर्निया -  फेसबुकने त्यांच्या कार्यालयात कर्मचाऱ्यांना अॅपलचे अायफाेन वापरण्यावर बंदी अाणली अाहे. अॅपलचे सीईअाे टीम कुक यांनी अप्रत्यक्षरीत्या फेसबुकबद्दल केलेली नकारात्मक कमेंट, हे यामागील कारण अाहे. त्यामुळे नाराज व संतप्त झालेले फेसबुकचे सीईअाे मार्क झुकेरबर्ग यांनी त्यांच्या स्टाफला अायफाेन साेडून अँड्राॅइड फाेन वापरण्याची सक्त तंबीच देऊन टाकली अाहे.  


काही दिवसांपूर्वी कुक यांनी एका मुलाखतीत डेटा प्रायव्हसीच्या मुद्द्यावर बाेलताना ‘खासगीपणा हा प्रत्येक व्यक्तीचा माैलिक अधिकार असून अाम्ही नागरिकांच्या या हक्काचे भान ठेवताे. त्यामुळे इतरांप्रमाणे अाम्ही युजर्सची वैयक्तिक माहिती विकत नाहीत,’ असा टाेला अप्रत्यक्षपणे हाणला. यासह ‘झुकेरबर्ग यांच्या जागी तुम्ही असता व तुमची कंपनी डेटा प्रायव्हसीसंदर्भातील वादात अडकली असती, तर काय केले असते?’ असा प्रश्न कुक यांना विचारण्यात अाला. त्यावर ‘मला विश्वास अाहे की, मी व माझी कंपनी कधीही अशा प्रकारच्या स्थितीत अडकलाे नसताे’, असे उत्तर दिले. कुक यांचा हा टाेला झुकेरबर्ग यांना चांगलाच जिव्हारी लागला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या व्यवस्थापन स्टाफची तत्काळ बैठक बाेलावून कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी अायअाेएसवर अाधारित कुठलेही डिव्हाइस वापरू नये. त्याएेवजी केवळ अँड्राॅइड फाेन वापरावा, असा फतवा काढला.  


याबाबत विचारणा केली असता झुकेरबर्ग म्हणाले की, मला अशा प्रकारची चर्चाच खाेटी वाटते. अाम्ही अशी कुठलीही सेवा देत नाहीत, जी केवळ श्रीमंतांनाच वापरता येईल. दुर्दैवाने अशा सेवा देणाऱ्या कंपन्या देशहिताचा दावा करतात. या कंपन्यांनी युजर्सचे हितरक्षक असल्याचा अाव अाणू नये. मला माझ्या कंपनीच्या सेवा व युजर्सबद्दलच्या संवेदनशीलतेवर पूर्ण विश्वास अाहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, फेसबुकमध्ये सुमारे २५ हजार कर्मचारी अाहेत. फेसबुकने डेटा प्रायव्हसीप्रकरणी मलिन  प्रतिमा सुधारण्यासाठी ‘डिफायनर्स’  एजन्सीची सेवा घेतली अाहे. ‘स्वत:च्या ग्राहकांचा फायदा हाेण्यासाठी विराेधकांविरुद्ध नकारात्मक अभियानाचा अाधार घेणारी संस्था’ अशी या संस्थेची प्रतिमा अाहे. ‘न्यूयाॅर्क टाइम्स’मधील वृत्तानुसार अॅपलबद्दल नकारात्मक मार्केटिंग करण्यावर भर देण्यासाठीच फेसबुकने ही सेवा घेतलीय.

 

वर्षभरात फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचे मनाेधैर्य ३२ % पर्यंत झाले कमी  
‘वाॅल स्ट्रीट जर्नल’च्या एका वृत्तानुसार डेटा लीकसारख्या वादांमुळे गत एका वर्षात फेसबुकच्या कर्मचाऱ्यांचे मनाेधैर्य ३२ % पर्यंत कमी झाले अाहे. २०१७ मध्ये फेसबुकचे ८४ % कर्मचारी कंपनीच्या भवितव्याबाबत अाश्वस्त हाेते. या अाकडेवारीचा थेट संबंध कर्मचाऱ्यांच्या मनाेधैर्याशी अाहे. मात्र, २०१७ मध्ये हा अाकडा ५२ % पर्यंत अाला. ५३ % कर्मचाऱ्यांनीच मान्य केले की, त्यांची कंपनी जगाचे भले करण्यात काही याेगदान देत अाहे, असेही या वृत्तात म्हटले अाहे. गतवर्षी हा अाकडा ७२ % पर्यंत हाेता.  

   

बातम्या आणखी आहेत...