आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराडॉ. अपर्णा अष्टपुत्रे-सिसोदे
तहान लागल्यावर विहीर खोदणे ही मानसिकता बदलली पाहिजे. घटना घडण्यापूर्वीच काही प्रतिबंधात्मक उपाय केले तर बलात्कारासारख्या घटना नक्कीच कमी होतील. प्रतिबंधात्मक उपाय अनेक स्तरांवर करणे गरजेचे आहे. वयाच्या विविध टप्प्यांवर आरोग्यपूर्ण मानसिकता निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतील. समाजाचा एक घटक म्हणून मी काय करू शकतो, ह्या भूमिकेवर मानसोपचार तज्ज्ञांनी टाकलेला प्रकाश...
माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटना घडतात आणि रान पेटावे तसे लोक त्यावर प्रतिक्रिया देत सुटतात ही उन्मादाची अवस्था समाजामध्ये काही काळ तशीच राहते आणि त्यानंतर कालांतराने लोक ते विसरूनही जातात, पुन्हा एखादी निर्भयासारखी घटना घडेपर्यंत लोक शांत राहतात. तहान लागल्यावर विहीर खोदणे ही मानसिकता बदलली पाहिजे. घटना घडण्यापूर्वीच काही प्रतिबंधात्मक उपाय केले तर अशा घटना नक्कीच कमी होतील. प्रतिबंधात्मक उपाय अनेक स्तरांवर करणे गरजेचे आहे. वयाच्या विविध टप्प्यांवर आरोग्यपूर्ण मानसिकता निर्माण व्हावी यासाठी वेगवेगळे उपाय करावे लागतील. हे उपाय मानसिकतेत किंवा विचारांमध्ये येण्यासाठी वर्तन करणे, वर्तनात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे.
लिंगभाव वर्तन खोडून काढा
मानसिकतेत बदल करायचा असेल तर तो कृतीतून केला जाणे अपेक्षित आहे. रोजच्या जीवनातील छोट्या छोट्या वर्तनात बदल केला पाहिजे. वयाच्या पस्तिशीचा टप्पा पार केलेले जे लोक आहेत त्यांना हा बदल करणे सगळ्यात कठीण आहे, कारण त्यांचे वर्तन हे आता स्वयंचलित झालेले आहे. त्यांचे बरेचसे वर्तन हे विचार करण्याआधी होत असते किंवा वर्तन करण्यासाठी विचार करण्याची आवश्यकता भासत नाही. तरी बदल हे नक्की करता येतात. त्याकरिता जाणीवपूर्वक कृती करायची गरज आहे. लिंगभाव समानता येण्यासाठी छोट्या गोष्टींमधून सुरुवात करूया. उदा. आपल्या मैत्रिणीने टिकली लावली नसेल तर त्याविषयी तिला आपण खोदून खोदून विचारू नये. दुचाकीवर पुरुष मागच्या सीटवर एका बाजूनेच पाय करून बसला असेल तर त्याकडे रोखून बघण्याची गरज नाही. तुमच्या मुलांना काही समजावून सांगताना मुलांसारखे ओरडू नको, मुलीसारखे रडू नको, मुलींसारख काय लाजतोस, ही कामे काय मुलांची/मुलींची आहेत का? अशी उदाहरणे देणे बंद करा. यातून पाल्यांमध्ये लिंगभाव अधिक गडद होत जातो. स्वत:च्या कृतीतून जाणीवपूर्वक लिंगभाव वर्तन खोडून काढण्याचा प्रयत्न करा.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.