आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बॉलिवू़ड डेस्कः अभिनेता अपारशक्ती खुराणाचे म्हणणे आहे की, तापसी पन्नू अभिनित चित्रपट 'रश्मी रॉकेट' अजून साइन केला नाही आणि चित्रपटांच्या निमार्त्यांसोबत सध्या बोलणी सुरू आहे. शाॅर्ट फिल्म 'नवाब'च्या स्पेशल स्क्रीनिंगदरम्यान तो म्हणाला, 'मी अद्यापही रश्मी रॉकेट' साइन केला नाही, परंतु बोलणी सुरू आहे. याची स्क्रिप्ट उत्कृष्ट आहे आणि मी तापसीचा मोठा चाहता आहे. मला असे वाटते की ज्याप्रकारचा ती प्रवास करत येथवर पोहचली, तो अद्भुत आहे.'
विद्या, तापसी आणि नुसरतमुळे प्रेरणा
लोक मला नेहमी विचारतात की, 'चित्रपटसृष्टीमध्ये तुम्हाला कोणाकडून प्रेरणा मिळाली?'तर मला विद्या बालन, तापसी पन्नू आिण नुसरत भरुचाचे नाव घ्यायला आवडेल. मला असे वाटते की, या सर्व महिलांचा प्रवास खूपच उत्कृष्ट आहे आणि ज्याप्रकारचे चित्रपट यांनी केले आहेत, ते मला खूप आवडतात. याशिवाय वैयक्तिक आयुष्यातदेखील याचा प्रवास मला खूप आवडला.'
अपारशक्ती लवकरच 'हेल्मेट' चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. यात त्याच्यासोबत मोहनीश बहलची मुलगी प्रनुतल बहल असणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.