आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Apollo Health Group Giving Franchises Of Apollo Diagnostics Centers

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नूतनवर्षात या मोठ्या कंपनीसोबत सुरू करा बिझनेस, फक्त 3 ते 5 लाख रूपये येईल खर्च

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली : आपण नवीन वर्षात नवीन बिझनेस सुरू करण्याचा विचार करत आहात. पण बिझनेस चालेल की नाही याबाबत शंका असेल तर तुम्हाला एखाद्या मोठ्या ब्रँडच्या फ्रँचायसीवर विचार करणे गरजेचे आहे. यामुळे बिझनेस सुरळीत चालण्याची शक्यता काही प्रमाणात वाढते. आज आम्ही तुम्हाला अशा कंपनीच्या फ्रँचायसीबाबत सांगत आहोत ज्यामध्ये तुम्हाला जास्त पैसा गुंतवण्याची आवश्यकता पडणार नाही. तुम्ही 3 ते 5 लाख रूपयांची गुंतवणूक करून हा बिझनेस सुरू करू शकता. 

 

या ग्रुपची फ्रँचायसी घेऊन शकता
आशियातील अग्रेसर हेल्थ केअर प्रोव्हायडर कंपनी अपोलो हॉस्पिटल ग्रुपला आज बहुतांश सगळेच ओळखतात. देशभरात ठिकठिकाणी या ग्रुपचे अपोलो हॉस्पिटल्स आहेत. तुम्हाला सुद्धा या ग्रुपसोबत बिझनेस करायचा असेल तर ही एक चांगली संधी आहे. अपोलो ग्रुपद्वारे फ्रँचायसी ऑफर करण्यात येत आहे. यासाठी तुम्हाला जास्त पैशांची गरज भासणार नाही. सध्या अपोलो डायग्नोस्टिकद्वारे देशभरात फ्रँचायसी देण्यात येत आहेत. तुम्ही सुद्धा यासाठी अप्लाय करू शकता.  

 

इतका येणार खर्च ?

तुम्हाला जर अपोलो डायग्नोस्टिकची फ्रँचायसी घ्यायची असेल तर  www.apollodiagnostics.in मते तुम्हाला 3 ते 4 लाख रूपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे. यासाठी तुमच्याकडे 180 ते 250 स्वेअर फूट जागा असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जागा असेल तर तुम्हाला कमी खर्ज करावा लागणार आहे. याशिवाय तुम्ही किरायाने देखील ही जागा घेऊ शकता. ही गुंतवणूक सिंगल युनिटसाठी आहे. पण तुम्हाला जर कलस्टर युनिट पाहिजे असेल तर तुम्हाला इतक्याच जागेत 15 ते 20 लाख रूपयांची गुंतवणूक करावी लागेल. 

 
ही आहे पात्रता?
तुम्ही जर डॉक्‍टर किंवा हेल्थ केअर क्षेत्रासोबत जोडलेले असाल तर हा व्यवसाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. पण ज्या लोकांना खरंच व्यवसाय करायचा आहे अशाच लोकांना अपोलो ग्रुपद्वारे फ्रँचायसी देण्यात येते. 
 
अपोलो अशाप्रकारे करते मदत
अपोलो ग्रुप फ्रँचायसीला अनेक सुविधा मोफत देतो. लॉजिस्टिक, कंझ्यूमेबल, सॉफ्टवेअर लायसेंस, मार्केटिंग सपोर्ट, सेल्स टीमद्वारे बिझनेस डेव्हलपमेंट अशाप्रकारच्या सुविधा ग्रुपतर्फे देण्यात येतात. याशिवाय अपोलोकडून कँप, हेल्थ चेकअप, आरडब्‍ल्‍यूएसोबत मिटींगसोबतच जाहिरातीसाठी मदत देखील देण्यात येते. 

 

अशाप्रकारे करावे अप्लाय 
अपोलो डायग्नोस्टिकची फ्रँचायसी घेण्यासाठी ऑनलाइन अप्लाय करू शकता. ऑनलाइन फॉर्म भरल्यानंतर अपोलो डायग्नोस्टिकची सेल्स टीम तुमच्यासोबत संपर्क साधेल आणि इतर औपचारिकता पूर्ण करण्यात येतील. खाली दिलेल्या लिंकवर संपूर्ण माहिती घेतल्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता. https://www.apollodiagnostics.in/for-business-partners/franchise-pcc-single-cluster/