यावल-फैजपूर मार्गावर भीषण / यावल-फैजपूर मार्गावर भीषण अपघात.. मालवाहू रिक्षाची दुचाकीला धडक, एक जागीच ठार

Feb 07,2019 03:08:00 PM IST

यावल- यावल–फैजपूर रस्त्यावर सांगवी गावाजवळ दुचाकी व मालवाहू अॅपेरिक्षाचा भीषण अपघात झाला. त्यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला. बुधवारी (ता.6) रात्री उशीरा हा अपघात झाला.

प्रमोद रमेश पवार (वय-29, रा. बऱ्हाणपूर, मध्य प्रदेश) असे मृत तरुणाचे नाव असून तो रूमाल विक्रीचे काम करत होता. अपघातानंतर रिक्षाचालक फरार झाला आहे.


मिळालेली माहिती अशी की, बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रमोद पवार हा आपल्या दुचाकीवरून (एमपी. 68 एमडी 6807) यावलकडून बर्‍हाणपूरकडे जात होता. फैजपूरकडून यावलकडे जाणारा मालवाहू अॅपेरिक्षाने (एमएच 19 एस 9963) सांगवी गावाजवळील पीर बाबांच्या दर्ग्याजवळ समोरुन येणार्‍या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला फेकला गेला. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याचा जागेवरच मृत्यू झाला.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... अपघाताची भीषणता दाखवणारे फोटो

X