आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघाताची मालिका थांबेना..यावल तालुक्यात पुन्हा अपघात, एक जागीच ठार, समाज मन सुन्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- तालुक्यात अपघाताची मालिका थांबता– थांबत नाही आहे. शनिवारी सांयकाळी पिळोदा- थोरगव्हाण रस्त्यावर मालवाहू अॅपेरिक्षा रस्त्याच्या कडेला उलटून झालेल्या अपघातात एक जण जागीच ठार झाला. वना गोविंदा भिल (वय ५५, रा. दगडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर रिक्षा चालक फरार झाला.

 

मिळालेली माहिती अशी की, विना क्रमांकाच्या माल वाहतूक करणारी अॅपेरिक्षा थोरगव्हाणकडून मनवेलकडे येत होता. दरम्यान, मनवेलगावा जवळील पिळाेदा फाट्याजवळ अचानक रस्त्याच्या कडेला रिक्षा उलटला. अपघातात वना गोविंदा भिल हे जागीच ठार झाले.

 

अपघाताची माहिती मिळताच पंचायत समितीचे सदस्य दीपक पाटील मनवेलचे माजी सरपंच अनिल पाटील घटनास्थळी धाऊन गेले व त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना कळवली आहे.घटनास्थळी हवालदार युनूस तडवी, राहूल चौधरी, भुषण चव्हाण आदी पोलिस पथक दाखल झाले आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. अपघाताचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...