आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय पक्षांची भूक!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वप्रथम आम्ही नतद्रष्ट्र बाेरूबहाद्दरांचा त्रिवार निषेध करतो. कारण यांना सरकारचे चांगले काहीच दिसत नाही. यांच्या लेखणीला सरकारची अॅलर्जी झाली आहे. तसे नसते तर भूक निर्देशांक' अहवालावरून त्यांनी एवढा गदारोळ माजवलाच नसता. खरे तर जागतिक, आर्थिक वा सामाजिक प्रगतीमध्ये भारताचे वा राज्याचे स्थान कितवे हे स्पष्ट करणारे अनेक अहवाल येतच असतात. तसाच हाही अहवाल आला. या भूक निर्देशांकात खूपच घसरण असल्याची ओरड बोरूबहाद्दरांनी सुरू केली. जणू काही ते अहवालाची वाटच पाहात होते... आता भुुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी देणे हा तर आमचा धर्मच आहे. मग धर्माचे पालन करण्यासाठी काहींना तर भुकेले आणि तहानलेले राहावे लागले, तर त्यात काय मोठेसे! शेवटी धर्माचे पालन होणे महत्वाचे. भय, भूक और भ्रष्टाचारमुक्त' कारभार केला तर विरोधकांनी कोणाविरूद्ध लढायचे आणि बोरूबहाद्दरांनी कशावर लिहायचे, हे कोणी समजून घेत नाही. लगेच झाली ओरड सुरू. बरे, अशा लोकांना आमच्या राजकीय पक्षांचा द्रष्टेपणा (व्हिजन) काही दिसला नाही. भूक निर्देशांकात घसरण होणार, हे जाणून शिवसेनेने आधीच आपल्या जाहीरनाम्यात पाच आणि भाजपने दहा रूपयात थाळी देणार असल्याचे जाहीर केले. म्हणजे गरीबाला आणि भुकेलेल्याला इतक्या स्वस्तात पोटभर जेवण मिळाल्यावर निर्देशांकाची झपाट्याने घसरण होणारच की नाही! पण, झापडबंद बोरूबहाद्दरांना हे दिसत नाही...  आम्हाला लहानपणी द्रौपदीची थाळी माहिती होती. श्रीकृष्णाने जेऊन फुंकर मारल्यावर हजारो ऋषींनी तृप्तीचे ढेकर दिल्याची कथाही आम्ही ऐकली आहे. अलीकडे अम्मा कँटीन माहिती होते. १९९५ मध्ये पहिल्या युती सरकारच्या काळात दहा रूपयात झुणका- भाकर योजना सुरू केली होती. तेव्हा, गरीबांच्या थाळीत झुणका- भाकर तर पडली नाही. पण, कार्यकर्त्यांनी मोक्याच्या जागा लाटल्या, असे काहींनी लिहिले. म्हणजे यांना कसे म्हणून चांगले काही दिसत नाही. राजकीय पक्षांची भूक िकती खादाड आहे, अशी चविष्ट वर्णने हे करत सुटतात ! पाच रूपयांत अटल आहार योजना किती क्रांतिकारी आहे. पाच रूपयात कांदा येत नाही. तिथे चक्क थाळी! आणि दुसरीकडे शिवथाळी! काय बिशाद आहे हंगर इंडेक्सची महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहाण्याची. पण, त्याकडे सकारात्मकतेने पाहाण्याची गरज आहे. निदान राज्यात तरी आता कोणी उपाशीपोटी झोपणार नाही. पिण्याची व्यवस्था गावोगावी होतीच. सरकारने आता खाण्याचीही केली आहे - सायबाँ खाना- बदोशो के हवाले कर दे ये घना पेड़, परिंदों के हवाले कर दे ठंडे मौसम में भी सड़ जाता है बासी खाना बच गया है तो गरीबों के हवाले कर दे असे आमचे मुनव्वर राणा म्हणतात. यासाठीच तर पाच आणि दहा रूपयांत थाळी आहे. मग बोंबाबोंब कसली करता? पहिले हाळी आणि नंतर टाळी द्या, राजे हो!  

बातम्या आणखी आहेत...