आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यूपी पोलिसांनी Apple कंपनीच्या मॅनेजरला गुन्हेगार समजून केले ठार, एकमेव प्रत्यक्षदर्शी तरुणीने मांडली हकीगत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनौ - उत्तर प्रदेश पोलिसांनी रात्री उशीरा आयफोन बनवणाऱ्या अॅपल कंपनीच्या अधिकाऱ्यावर गोळ्या झाडल्या. ही घटना लखनौमध्ये शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री घडली. एका चेक पोस्टवर पोलिसांनी त्याची एसयूव्ही थांबवण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्याने नकार दिला. त्याचवेळी पोलिसांनी त्याला गुन्हेगार समजून गोळ्या झाडल्या. गाडी चालवणाऱ्याचे नाव विवेक तिवारी (38) असे होते. तो अॅपल कंपनीचा एरिआ मॅनेजर होता. दरम्यान पोलिस या प्रकरणाला आत्मरक्षण सांगून दाबण्याचा प्रयत्न करत असताना एक महिला प्रत्यक्षदर्शी समोर आली आहे. ती घटनेच्या वेळी त्याच कारमध्ये विवेकसोबत होती.

 

काय म्हणाली प्रत्यक्षदर्शी?
- अॅपल कंपनीत काम करणारी सना हिने सांगितल्याप्रमाणे, "गोमती नगर परिसरात शुक्रवारी रात्री 1:30 वाजता मी आपला सहकारी विवेक उर्फ विनय तिवारीसोबत प्रवास करत होते. त्याचवेळी गोमती नगर परिसरात कार काही वेळ थांबली. अचानक दोन पोलिस कर्मचारी बाइकवर कारजवळ आले. त्यांनी कार थांबवण्यास सांगितले. मी कारमध्ये एकटेच होते. काही वाइट घडू नये या भीतीने सरांनी (विवेक) कार पुढे नेली. 
- "यानंतर मला फायरिंगचा आवाज आला आणि सरांच्या डोक्यातून रक्त वाहत होते. यावर घाबरून सरांनी कार वेगात पळवली. काही अंतरावरच जाऊन कार धडकली. दोघे पोलिस कर्मचारी आपली बाइक सोडून घटनास्थळावरून पसार झाले." पोलिसांनी विवेकच्या डोक्याचा निशाणा धरून गोळ्या झाडल्या असे सनाने सांगितले आहे. गंभीर अवस्थेत विवेकला राम मनोहर लोहिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारात त्याचा मृत्यू झाला. 

 

उपचारादरम्यान मृत्यू
विवेकला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, शनिवारी सकाळी उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ड्रायव्हर आपल्या माजी सहकाऱ्यासोबत येत होता. गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले. परंतु, तिवारी काही थांबला नाही. यानंतर बाइकवर त्यांचा पाठलाग करणाऱ्या पोलिसांना सुद्धा त्याने धडक दिली. 


आत्मरक्षणासाठी केला गोळीबार -पोलिस
पोलिस काँस्टेबल प्रशांत कुमार यांनी तिवारीवर फायरिंग केली. "कुमार यांनी सांगितले, की त्यावेळी पथदिवे बंद होते आणि रस्त्यावर खूप आंधार होता. त्याचवेळी आम्ही एका एसयूव्हीजवळ पोहोचलो. कार थांबलेली होती. आम्ही आमची बाइक कारच्या थेट समोर लावली. त्याचवेळी अचानक ड्रायव्हरने कार सुरू केली आणि आमच्या बाइकला धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. आम्ही त्याला अडवण्याचाही प्रयत्न केला. परंतु, त्याने कार रिव्हर्स घेतली आणि पुन्हा आम्हाला धडक दिली. यानंतरही आम्ही त्यांना बाहेर येण्यास सांगितले. तेव्हा पुन्हा फुल स्पीडने ड्रायव्हरने कार रिव्हर्स घेतली आणि आणखी जोरदार धडक दिली. मी खाली पडलो होतो. यानंतर त्याला भीती दाखवण्यासाठी मी पिस्तुल बाहेर काढली. हे पाहून त्याने परत गाडी माझ्या अंगावरून नेण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी आत्मरक्षणासाठी मला फायरिंग करावी लागली."

 

सना घरात नजरकैद
गोमती नगरच्या विनयखंड 3 येथील घरात राहणारी विवेकची मैत्रिण सना आपल्या घरातच नजरकैदेत आहे. या गोळीबाराच्या घटनेतील ती एकमेव साक्षीदार आहे. तिच्या घरावर पहारा दिला जात असून तिच्या सुरक्षेची काळजी घेतली जात आहे असा दावा पोलिस करत आहेत. 

 

पोलिस ताब्यात, गुन्हा अज्ञातांविरुद्ध...
विवेकच्या शवविच्छेदन अहवालात त्याचा मृत्यू गोळीबारातच झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तरीही गुन्हा अज्ञातांविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. सनाच्या आरोपानंतरही पोलिसांनी आरोपी पोलिस हवालदारांच्या विरोधात गुन्हा दाखल केला नाही. दोन्ही पोलिस कर्मचारी प्रशांत चौधरी आणि संदीप यांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...