Home | International | Other Country | Apple can launch three new phones

अॅपल तीन नवे फोन लाँच करण्याची शक्यता; प्रीमियम मॉडेलमध्ये ४-जीबी रॅम, वायरलेस चार्जिंग

वृत्तसंस्था | Update - Sep 07, 2018, 08:54 AM IST

तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात (१२ सप्टेंबर) आयफोनचे नवीन तीन मॉडेल लाँच

 • Apple can launch three new phones

  कूपरटिनो (कॅलिफोर्निया)- तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी अॅपल त्यांच्या वार्षिक कार्यक्रमात (१२ सप्टेंबर) आयफोनचे नवीन तीन मॉडेल लाँच करण्याची शक्यता आहे. हे नवीन फोन ५.८ इंच आणि ६.५ इंच ओएलईडी डिस्प्लेसह येण्याचा दावा करण्यात येत आहे. तर तिसरा फोन ६.१ इंच एलसीडी स्क्रीनसह लाँच होण्याची शक्यता आहे.


  ९ टू ५ मॅकच्या अहवालानुसार, ५.८ इंच तसेच ६.५ इंच डिस्प्लेच्या माॅडेलना आयफोन-एक्स या नावाने लाँच करण्याची शक्यता आहे. तर ६.१ इंच मॉडेलला आयफोन -९ नावाने बाजारात आणले जाऊ शकते. या फोनची किंमत मागील वर्षी लाँच झालेल्या आयफोन - एक्सपेक्षाही कमी असू शकते.


  साइटवर गोल्ड मॉडेलचे छायाचित्र देखील जारी करण्यात आले आहे. यानुसार ५.८ इंच मॉडेलची किंमत सुमारे ४८,००० - ५४,७०० रुपये अाणि ६.५ इंच मॉडेलची किंमत सुमारे ६८,३०० रुपये राहण्याची शक्यता आहे. तर आयफोन-९ स्वस्तातले मॉडेल असू शकते, ज्याची किंमत ४१,००० ते ४८,००० रुपयांच्या दरम्यान असू शकते.
  मीडियामध्ये आलेल्या रिपोर्टसनुसार, १२ सप्टेंबर रोजी लाँचिंग नंतर १४ सप्टेंबरपासून या फोनची प्री-बुकिंग सुरू होण्याची शक्यता आहे. वास्तविक आयफोन-९ ची बुकिंग सुरू होण्यासाठी अद्याप थोडा वेळ जावा लागणार आहे. नवीन फाेनमधील फीचर्ससंदर्भात अद्याप कोणत्याही प्रकारचा खुलासा झालेला नाही. मात्र, कंपनीच्या ६.५ इंच प्रीमियम मॉडेलमध्ये फोर-जीबी रॅम असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. वास्तविक दोन्ही मॉडेल थ्री-जीबी रॅममध्ये मिळतील अशी चर्चा आहे.


  नवीन आयफोनचा ६.१ इंचाचे मॉडेल ड्युएल सिमसह येण्याची शक्यता असून, हा भारतात लाँच करण्याची शक्यता कमी असल्याचे मत यात व्यक्त करण्यात आले आहे. तर ५.८ इंच आणि ६.५ इंच स्क्रीन असलेल्या मॉडेल्समध्ये ड्युएल रिअर कॅमेरा मिळेल, तर ६.१ इंच मॉडेलसह सिंगल रिअर कॅमेरा देण्यात येण्याची शक्यता आहे.


  तिन्ही आयफोन आयओएस १२ सोबत लाँच होतील
  या कार्यक्रमात आयफोनव्यतिरिक्त दोन नवीन आय पॅड, नवीन मॅक बुक, अॅपल वॉच सिरीज-४ आणि वायरलेस चार्जिंग मॅट देखील लाँच होण्याची शक्यता अाहे. या वृत्तानुसार नवीन आयफोन-९ चा प्रीमियम मॉडेल (६.५ इंच) वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल. उर्वरित दोन्ही मॉडेलमध्ये हे फीचर मिळेल किंवा नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. तिन्ही आयफोन नवीन ऑपरेटिंग सिस्टिम आयओएस -१२ सह लाँच होतील. जुन्या मॉडेलमध्ये आयओएस-१२ अपडेट येण्यास अद्याप काही काळ जाण्याची शक्यता आहे. जे आयओएस-११ चा सपोर्ट करतात, त्या सर्व फोनमध्ये आयओएस १२ चे अपडेट मिळणार आहे. म्हणजेच आयफोन-५ एसच्या वरच्या सर्व मॉडेल्सचा आयओएस - १२ अपडेट मिळेल.

Trending