आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल 18 वर्षे जुन्या आयट्यून्स बंद करणार, तीन नवीन अॅप आणणार 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सॅनजाेस - अॅपलने १८ वर्षे जुन्या आयट्यून प्लॅटफाॅर्म बंद करण्याची घाेषणा कंपनीचे सीईआे टिम कुक यांनी वार्षिक जागतिक विकासक परिषदेत केली. आयआेएस १३, नवीन आयपॅड आेएस, अॅपल घड्याळासाठी नवीन आेएस ६, टीव्हीसाठी आेएस १३ बाजारात आणण्याची घाेषणाही कूक यांनी यावेळी केली. यंदाच्या वर्षातल्या या सर्वात माेठ्या साॅफ्टवेअर कार्यक्रमात 'मॅक प्राे'मध्ये देखील अॅपलने प्रवेश केला आहे. आयट्यून्स हळूहळू बंद करून त्याजागी तीन नवीन अॅप बाजारात आणण्यात येणार आहेत. 


हे म्युझिक, पाॅडकास्ट आणि टीव्ही अॅप असतील. त्याचबराेबर अॅपलने आपल्या सर्व उपकरणांसाठी एकच आॅपरेटिंग सिस्टीम आणण्याचेही संकेत दिले असून त्याचे नाव कॅटलिना असेल. सप्टेंबर २०१९ मध्ये हाेणाऱ्या कार्यक्रमात हे उत्पादन बाजारात येण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...