Home | Maharashtra | Mumbai | Apple iPhone blast during charging, young boy injured

चार्जिंगसाठी लावलेल्या 'अॅपल आयफोन'चा स्फोट, अंबरनाथमधील तरूण जखमी

दिव्य मराठी वेब टीम | Update - May 15, 2019, 01:43 PM IST

यासंदर्भात अमित अॅपल कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहे

  • Apple iPhone blast during charging, young boy injured

    ठाणे- चार्जिंगला लावलेल्या फोनचा फोट झाल्याच्या अनेक घटना आपण पाहत असतो. अशीच एक घटना अंबरनाथमध्ये घडली आहे. अॅपल आयफोनचा चार्जिंगदरम्यान स्फोट होऊन एक तरुण जखमी झाल्याची घटना घडली. अमित भंडारी असे या जखमी तरुणाचे नाव आहे. यासंदर्भात अमित अॅपल कंपनीविरोधात तक्रार दाखल करणार आहे.


    अंबरनाथमधील कोहोजगाव या ठिकाणी राहणाऱ्या अमितने गेल्यावर्षी अॅपल कंपनीचा आयफोन-6 हा स्मार्टफोन खरेदी केला होता. रविवारी (12 मे) त्याच्या फोनची बॅटरी कमी असल्याने त्याने घरात फोन चार्जिंगला लावला. चार्जिंगला असतानाच त्याने मेसेज वाचण्यासाठी फोन हातात घेतला होता, यावेळी काही सेकंदात आयफोनचा स्फोट झाला. या स्फोटात अमितच्या दोन्ही पायांना जखम झाली.


    या घटनेनंतर अमितला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या अमितवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी अमित अॅपल कंपनीकडे तक्रार दाखल करणार आहे. गेल्या काही वर्षांपासून मोबाईल स्फोट होण्याच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. मोबाईल चार्जिंगला असताना, चार्जिंग लावून फोनवर बोलत असताना अचानक स्फोट झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडल्या आहेत. दरम्यान नुकतेच अॅपल या नामांकित कंपनीच्या मोबाईलचा स्फोट झाल्याने तंत्रज्ञान विश्वात एकच खळबळ उडाली आहे.

  • Apple iPhone blast during charging, young boy injured

Trending