आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सॅमसंगनंतर या कंपनीच्या मोबाइलच्या बॅटरीचा स्फोट, फोन रीबूट करताच झाला ब्लास्ट; फक्त 10 महिन्यांपूर्वी घेतला होता फोन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क - आजकाल मोबाइल फोनची बॅटरी फुटण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी सॅमसंग फोनच्या बॅटरीचा स्फोट झाला होता. आता आयफोनची बॅटरी फुटण्याची घटना घडली आहे. युझरने ट्वीटरवर स्फोट झालेल्या फोनचा फोटो शेअर केला आहे. फोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट करताना हा अपघात झाला. युझरने स्फोट झालेल्या Apple iPhone X चे फोटो शेअर केले आहेत. यामध्ये फोनचा मागील भाग जळालेला दिसत आहे.

 

फक्त 10 महिन्यांपूर्वी घेतला होता Iphone X
Iphone X स्मार्टफोनची किंमत 70 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. युझरने सांगितले की. लेटेस्ट iOS 12.1 ला अपडेट करतांना मोबाइल रीबूट केला तेव्हा त्यामधून धूर निघण्यास सुरूवात झाली आणि मोबाइलने पेट घेतला. काही दिवसांपूर्वी सॅमसंग फोनची बॅटरीचा स्फोट झाल्याची घटना समोर आली होती. आइसलँडमध्ये एका महिलेने Galaxy Note 9 स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट झाल्याची तक्रार नोंदविली होती. महिलेने नवीन फोन विकत घेतला होता आणि पर्समध्ये बॅटरीचा स्फोट झाला होता.

 

> मोबाइल चार्ज होत असताना त्याच्या सभोवताली जास्त रेडिएशन निर्णाण होत असते. यामुळे बॅटरी गरम होते. त्यामुळे चार्जिंनच्या वेळी बोलताना त्याचा स्फोट होण्याचा धोका संभवतो. बऱ्याचवेळा युझरच्या चुकांमुळे बॅटरी ओव्हर हीट होऊन फुटते. बॅटरीचे सेल डेड होत असतात. त्यामुळे फोनमध्ये केमिकल बदल होतात आणि बॅटरी फुटते.

 

बॅटरीचा विस्फोट होण्यापूर्वी मिळू शकतात 3 संकेत
> फोनची स्क्रीन ब्लर होणे किंवा स्क्रीनवर पूर्णपणे डार्कनेस येणे 
> फोन दरवेळी हँग होणे आणि प्रोसेसिंग कमी होणे
> बोलताना फोन नेहमीपेक्षा अधिक गरम होणे


खराब बॅटरीला कशी तपासावी
> बॅटरी एका टेबलवर ठेवून फिरवा. जर बॅटरी फुगलेली असेल तर जोरात फिरेल. अशावेळी त्या बॅटरीचा वापर टाळावा.
> काही स्मार्टफोनची बॅटरी इनबिल्ट असते, अशावेळी त्यांच्या गरम होण्यावरून ओळखले जाते. फोन जास्त गरम होत असेल तर तपासून घ्यावा.
> बॅटरीची चार्जिंग कधीही पूर्णपणे संपू देऊ नका. बॅटरी पूर्णपणे संपल्यावर चार्ज होण्यास त्याला जास्त पावर लागते. यामुळे सुद्धा स्फोट होऊ शकतो. बॅटरी 20% असतांना चार्ज करणे योग्य असते.


या चुका टाळण्याचा प्रयत्न करा
> फेक चार्जर, फेक बॅटरीचा वापर करू नका. ज्या कंपनीचा फोन वापरत असाल त्याच कंपनीचे चार्जर वापरा.
> पाण्यात भिजलेल्या फोनला चार्जिंग करू नका. फोन चार्जिंग करत असतांना त्याचा वापर टाळावा.
> बॅटरी खराब झाल्यास तात्काळ नवी बॅटरीचा वापर करावा.
> फोनला जास्त तापमानात राहू देऊ नका.
> मोबाइलला 100% चार्ज करू नका त्यामुळे बॅटरी खराब होण्याचा धोका संभावतो. 80 ते 85% दरम्यान मोबाइल चार्ज करणे योग्य मानले जाते.

> ओरिनल चार्जरद्वारे मोबाइल चार्ज न केल्यामुळे मोबाइलची बॅटरी हळू हळू खराब होते. सोबतच चार्जिंग स्पीट देखील स्लो होतो. 

> मोबाइलला कोणत्याही गरम जागेवर ठेवून चार्ज केल्यास बॅटरी अधिक वेगाने गरम होण्यास सुरूवात होते. यामुळे बॅटरी आणि मोबाईल खराब होण्याची शक्यता असते.

बातम्या आणखी आहेत...