आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Apple Launch Event चे काउंटडाउन सुरु, लाँच होऊ शकतात 3 नवीन iPhone

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली: जगभरात आपल्या इनोवेटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी प्रसिध्द असलेले अॅप्पल आता पुन्हा एकदा आपले प्रोडक्ट लाँच करणार आहे. ग्लोबल मीडियामध्ये सुरु असलेल्या वृत्तांनुसार, आज होणा-या या लाँच प्रोग्राममध्ये कंपनी एकाच वेळी 3 नवीन फोन लाँच करणार आहे. भारतीय वेळेनुसार, हा इव्हेंट रात्री 10.30 वाजता सुरु होईल. यामुळेच इव्हेंटचे काउंटडाउन सुरु झाले आहे. 


ड्यूअल सिम फोन होऊ शकतो लाँच 
सुत्रांनुसार, कंपनी पहिल्यांदा दोन सिमचे स्मार्टफोन लाँच करु शकते. बीबीसी रिपोर्टनुसार, जे 3 फोन लाँच होतील, ते वेगळे फीचर आणि कन्फिगरेशन असणारे असू शकतात. अॅप्पलचे कस्टमर दिर्घकाळापासून ड्यूअल सिम स्लॉटच्या iPhones च्या प्रतिक्षेत आहेत. कंपनी ड्यूअल सिमसोबत एकच फोन लाँच करु शकते. यानंतर ड्यूअल सिम कार्ड स्लॉटची लोकप्रियता पाहून  Apple हे भारतात उतरवण्याचा विचार करु शकते. 


iPhones चे 3 मॉडल होऊ शकतात लाँच 
अॅप्पलच्या आज होणा-या इव्हेंटमध्ये तीन नवीन iPhones लाँच केले जाण्याची शक्यता आहे. कंपनी जे तीन फोन लाँच करेल त्याचे नाव  iPhone XS, iPhone XS Max असू शकते. यासोबतच Apple Watch Series 4 smartwatch  ही लाँच होऊ शकतो.  Apple च्या या नवीन इव्हेंटमध्ये  iPad Pro (2018) लाँच केले जाण्याची शक्यता आहे. याची लाइव्ह स्ट्रीमिंग  iPhone, iPad, iPod वर सफारीच्या माध्यमातून पाहिली जाऊ शकते. यासाठी  iOS 10 किंवा त्यापेक्षा चांगले व्हर्जन असणे गरजेचे आहे.


iPhone 9, iPhone Xs, iPhone Xs Max याचे फिचर्स काय असू शकतात 
मीडिया रिपोर्टनुसार, अॅप्पल जो फोन लाँच करेल यामध्ये एक 6.1  इंचचा एलसीडी वेरिएंटचा iPhone असेल. यासोबतच इतर दोन मॉडल्समध्ये ओएलईडी डिस्प्ले मिळेल. इतर दोन ओएलईडी मॉडल्सच्या  iPhones विषयी बोलायचे झाले तर एकामध्ये 5.8 इंच स्क्रिन असेल. हे कंपनी iPhone X च्या सक्सेसर प्रमाणे लाँच करेल. यासोबतच इतरमध्ये 6.5 इंचचा डिस्प्ले असू शकतो. नुकतेच रिपोर्ट्समधून समोर आले आहे की, ओएलईडी डिस्प्लेच्या  iPhone ला iPhone X आणि iPhone Xs Max च्या नावाने ओळखले जाईल. तर एलसीडी व्हेरिएंटच्या iPhone ला iPhone 9 किंवा  iPhone Xs Max च्या नावाने ओळखले जाईल. तर एलसीडी व्हेरिएंटच्या  iPhone ला  iPhone9 किंवा iPhone Xr च्या नावाने संबोधन्यात येईल. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...