आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपलने प्रथमच लाँच केला ६.५ इंच स्क्रीनचा आयफोन, नव्या अॅपल वॉचमध्ये फक्त ३० सेकंदांत काढा ईसीजी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्यूपर्टिनो (कॅलिफोर्निया)- अॅपलने बुधवारी ‘आयफोन -१० एस’,‘१० एस मॅक्स’ आणि ‘आयफोन -१० आर’ हे तीन फोन लाँच केले. याशिवाय अॅपल वॉचची (सिरीज-४) चौथी मालिकाही बाजारात आणली. आयफोन-१० एस आणि १०एस- मॅक्स हे ड‌्युएल सिम फोन आहेत. दोन्हीमध्ये ओएलईडी स्क्रीन आहेत. आयफोन-१०आर मध्ये एलसीडी स्क्रीन देण्यात आला आहे. ६.५ इंच स्क्रीनचा मॅक्स हा अॅपलचा सर्वात मोठा स्मार्टफोन आहे. यात १२ एमपी वाइड अँगल कॅमेरा आणि १२ एमपी टेलिफोटो कॅमेरा अशी ड्यूएल कॅमेरा सिस्टीम आहे.


स्क्रीन आकार : आयफोन १० एस -५.८ इंच, १० एस मॅक्स : ६.५ इंच
स्टोअरेज : ६४, २५६ आणि ५१२ जीबी
विक्री : १० एस व १० एस मॅक्सची बुकिंग १४ सप्टेंबरपासून, विक्री २१ सप्टेंबरला. १० आरची बुकिंग १० ऑक्टोबरपासून, तर विक्री २६ ऑक्टोबरला सुरू होणार आहे.


आपत्कालीन स्थितीत घड्याळ स्वत:हून करेल फोन...
स्क्रीनचा आकार सिरीज-३ हून ३५% अधिक आहे. यात ६४ बीट प्रोसेसर असून यामुळे क्षमता दुपटीने वाढेल. स्पीकरचा आवाजही ५० टक्के अधिक अाहे. याची बॅटरी १८ तास चालते. यासाठी १४ सप्टेंबरपासून ऑर्डर व २१ सप्टेंबरपासून विक्री सुरू होईल. हे घड्याळ कुठे पडले व एक मिनिट उचलले नाही तर ते आपत्कालीन सेवेला फोन करेल, लोकेशन सांगेल.

 

जीपीएस : प्रारंभिक किंमत ३९९ डॉलर (२९,००० रु.) सध्या हे मॉडेल २६ देशांत मिळेल.
सेल्युलर : प्रारंभिक किंमत ४९९ डॉलर (३६,२०० रु.) सध्या १६ देशांमध्ये मिळेल.
सिरीज ४ : प्रारंभिक किंमत २७९ डॉलर (२०,२०० रु.)

बातम्या आणखी आहेत...