आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘अॅपल’चा महिलांसाठी अॅप डेव्हलपमेंट प्रोग्राम,महिला ‘सीईअाे’ असलेल्या कंपनीला घेता येईल सहभाग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफाेर्निया -  अॅपल कंपनीने नवीन अॅप डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला अाहे. त्याचे नाव अाहे अांत्रप्रेन्याेर कॅम्प. या शिबिरात सहभागी हाेण्यासाठी अॅपल कंपनीने काही अटी ठेवल्या अाहेत. ज्या कंपन्यांची स्थापना महिलांनी केली अाहे किंवा ज्या कंपनीच्या संस्थापकांमध्ये महिला असेल किंवा ज्या कंपनीच्या सीईअाे किंवा प्रमुख पदावर महिला असतील, अशी कंपनी या प्रोग्राममध्ये सहभागी हाेऊ शकेल. यात सहभागी हाेऊ इच्छिणाऱ्या कंपनीच्या टीममध्ये किमान एक तरी महिला असायला हवी.  


दाेन अाठवड्यांचे हे अांत्रप्रेन्याेर शिबिर जानेवारी महिन्यात हाेईल. महिला उद्यमींना अॅपल कंपनीचे इंजिनिअर्स काेडिंगचे प्रशिक्षण देतील. त्याशिवाय डिझाइन, टेक्नाॅलाॅजी व अॅप स्टाेअरच्या मार्केटिंगबाबतही प्रशिक्षण दिले जाईल. सुरुवातीला १० कंपन्यांच्या प्रतिनिधींना हे प्रशिक्षण दिले जाईल. विशेष म्हणजे हा कॅम्प नि:शुल्क असेल.  


तज्ज्ञांच्या मते, जे स्टार्टअप सध्या फक्त अँड्राॅइड बेसवर अॅप बनवते, त्यांच्यासाठी अॅपची इकाेसिस्टिम समजून घेण्याची चांगली संधी अाहे. कारण अॅपलचे इंजिनिअरच त्यांना याबाबत माहिती देणार अाहेत. अॅपलच्या वर्ल्ड वाइड डेव्हलपर मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ संचालक ईस्थर हेअर यांनी सांगितले, ज्या महिला सध्या अॅपच्या व्यवसायात अाहेत त्यांच्यावरच अामचा फाेकस असेल. मात्र त्या अॅपलच्या सिस्टिमसाठी काम करत असाव्यात अशी अट नाही. ’

 
फक्त २.२ % फंडिंग महिला उद्याेजकांना सध्या मिळते, त्यात वाढ हाेऊ शकेल  : या प्राेग्रॅममुळे महिलांना अापल्या व्यवसायासाठी माेठ्या प्रमाणावर फंडिंग मिळण्यास मदत हाेईल. या वर्षी अमेरिकेत जितकी गुंतवणूक झाली त्यापैकी फक्त २.२ % महिला उद्याेजकांच्या खात्यात गेली अाहे.  २०१७ मध्येही असेच प्रमाण हाेते. महिलांच्या कंपनीत १३,५०० काेटी रुपयांची गुंतवणूक झाली तर पुरुषांच्या कंपनीत हेच गुंतवणुकीचे प्रमाण तब्बल ५.८ लाख काेटींपर्यंत हाेते. तरीही अमेरिकेत महिलांच्या कंपन्यांचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत दुपटीने वाढत अाहे. 

 

मी टू : महिलांशी बाेलताना पुरुष सतर्क 
-‘मी टू’ अांदाेलनानंतर ८० % पुरुष महिला सहकाऱ्यांशी बाेलताना जास्त सावधगिरी बाळगत अाहेत. व्हेलाेसिटी एमअार नामक मार्केट रिसर्च कंपनीने एका अहवालातून हे निष्कर्ष काढले अाहेत.  मुंबई, दिल्ली, बंगळुरू, काेलकाता, हैदराबाद व चेन्नईत २,५०० हून अधिक लाेकांशी केलेल्या चर्चेतून हा निष्कर्ष काढला.

 
- ८० % लाेकांना नाेकरी जाण्याची व बदनामीची भीती  
- ७० % लाेकांनी सांगितले, या अांदाेलनानंतरही महिलांना लक्ष्य करण्याचे प्रकार सुरूच  
- ५० % लाेकांनी शाेषणाच्या तक्रारी नंतर करणे चुकीचे सांगितले, २० % पुरुषांना मात्र याेग्य वाटते.  

बातम्या आणखी आहेत...