भारतात होणार Apple / भारतात होणार Apple iPhone X ची निर्मीती, 25 हजार नोकरीच्या संधी निर्माण होणार

दिव्य मराठी वेब टीम

Dec 28,2018 12:00:00 AM IST


नवी दिल्ली : अॅप्पल इंक (Apple Inc)2019 च्या सुरुवातीला भारतात आयफोन्सच्या निर्मीती करणार आहे. अॅप्पल फॉक्सकॉन या लोकल यूनिटच्या माध्यामातून हे काम करणार आहे. रॉयटर्सच्या एका अहवालानुसार तैवानची कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चर कंपनी भारतात लवकरच प्रॉडक्टची असेंबलिंग करण्यास सुरुवात करणार आहे. यामुळे भारतात 25 हजार नवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

भारतात होणार सर्वात महागड्या मॉडल्सची असेंबलिंग
विशेष बाब म्हणजे फॉक्सकॉन भारतात आपल्या मुख्य असलेल्या iPhone X सारख्या सर्वात महाग मॉडल्सची असेंबलिंग करणार आहे. यामुळे अॅप्पलचा भारतातील बिझनेस नवीन स्तरावर जाणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. तसेच फॉक्सकॉनच्या तमिळनाडुच्या श्रीपेरुम्बुदुर येथे असलेल्या प्लांटमध्ये हे असेंबलिंग होणार आहे.

विस्तारासाठी करणार 25 अब्ज रूपयांची गुंतवणूक
फॉक्सकॉन सुरुवातीपासूनच शाओमी (Xiaomi Corp)च्या फोनची निर्मीती करत आहे. तमिळनाडुचे औद्योगिक मंत्री एम.सी. संपत यांनी सांगितले की, फॉक्सकॉन कंपनी आयफोनच्या प्रॉडक्शनसह प्लांटच्या विस्तारासाठी 25 अब्ज रूपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे 25 हजार नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहे. आणखी एका सुत्राने फॉक्सकॉनच्या भारतात आयफोनची असेंबलिंग करण्याच्या योजनेची पुष्टि केली आहे.

भारतात जास्त प्रमाणात होते स्वस्त आयफोन विक्री
आतापर्यंत आयफोन बंगळुरू येथील विस्ट्रन कॉर्पच्या लोकल युनिटच्या माध्यमातून भारतात एसई आणि 6 एस सारख्या स्वस्त मॉडल्सची निर्मीती करत होती. भारतात अॅप्पलच्या एकूण विक्रीपैकी अर्ध्याहून जास्त विक्री स्वस्त फोनची होते. अॅप्पलने मागील वर्षीच iPhone X सारखा महागडा फोन लाँच केला होता. पण iPhone XS आणि XR या नवीन वर्जनची विक्री सुरू केल्यामुळे कंपनीने iPhone X चे उत्पादन कमी केले होते.

X
COMMENT