आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अॅपल ट्रिपल कॅमेरा असलेले दोन आयफोन लाँच करण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅलिफोर्निया - अमेरिकी कंपनी अॅपल या वर्षी ट्रिपल कॅमेरा असलेले दोन नवीन आयफोन लाँच करण्याची शक्यता आहे. या आधी या वर्षी आयफोन एक्सएस, एक्सएस मॅक्स आणि एक्स आरचे अपग्रेड स्वरूपात तीन नवीन आयफाेन लाँच होणार असल्याचे वृत्त होते. मात्र, जपानी ब्लॉग मॅकओटाकारा यांच्या नुसार अॅपल ओलेड स्क्रीन आणि मागील बाजूला तीन कॅमेरा असलेला आयफोन लाँच करणार आहे. यातील एक ६.१ इंचाचा तर दुसरा ६.५ इंचाचा असेल. 


या अहवालानुसार अॅपलच्या चीनमध्ये असलेल्या पुरवठादार चेनच्या सूत्राचा हवाला देण्यात आला असून त्यांच्या नुसार या कॅमेऱ्याचे लंेन्स मोठे असतील. त्यांचे सेन्सॉरचा आकारही मोठा असेल. दोन्ही फोन सध्याच्या एक्सएस आणि एक्सएस मॅक्सच्या तुलनेमध्ये थोडे जास्त जाड असतील. यामध्ये यूएसबी टाइप बी कनेक्टर असेल. त्याच बरोबर फास्ट चार्जिंग आणि दोन्ही बाजूने वायरलेस चार्जिंग ची सुविधाही असेल. या आधीच्या वृत्तानुसार केवळ आयफोन एक्सएसच्या जागी येणाऱ्या फोनमध्येच ट्रिपल कॅमेरा असेल असे म्हटले होते.