आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Apple TV Plus Service Launched In More Than 100 Countries Including India, Apple's New Customers Will Get One Year Free Subscription

भारतासहित 100 पेक्षा अधिक देशात सुरू झाली अॅपल टीव्ही प्लस सर्व्हिस, अॅपलच्या नवीन ग्राहकांना मिळेल एक वर्षाचे फ्री सब्सक्रिप्शन

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गॅजेट डेस्क- बहुप्रतीक्षित अॅपल टीव्ही प्लस सर्व्हिस 1 नोव्हेंबरपासून भारता सहित जगभरातील 100 पेक्षा जास्त शहरात लाइव्ह झाली आहे. याला अॅपल टीव्ही अॅपच्या मदतीने आयफोन, आयपॉड टच, आयपॅड, अॅपल टीव्ही आणि मॅकमध्ये वापरू शकता. भारतात पहिल्या आठवड्यात याचे फ्री-ट्रायल मिळणार आहे. ट्रायल संपल्यानंतर दर महिना 99 रुपये भरुन कुटुंबातील 5 सदस्य याचा लाभ घेऊ शकतात. जर एखाद्या ग्राहकाने नवीन अॅपल डिव्हाइस खरेदी केले असेल, तर त्याला अॅपल टीव्ही प्लस सर्व्हीस एक वर्षासाठी फ्री मिळेल.कंपनीचे म्हणने आहे की, अॅपल टीव्ही प्लस सर्व्हिसमध्ये ग्राहकांना दर दोन महिन्यात नवीन कंटेट मिळेल, ज्यात फॅमिली आणि किड्स शो देखील सामील आहेत. नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओमध्ये जिथे ओरिजनल कंटेंट शिवाय अनेक नवीन कंटेंट मिळतो, तर अॅपल टीव्ही प्लस सर्व्हिसमध्ये फक्त ओरिजनल कंटेंट मिळेल. आपल्या यूजर्ना उत्कृष्ट कंटेट देण्यासाठी अॅपल यात 6 बिलियन डॉलर (अंदाजे 42,635 कोटी रुपये) चीं गुंतवणूक करणार आहे. पण हे नेटफ्लिक्स (15 बिलियन डॉलर वार्षिक) आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओ (7 बिलियन डॉलर वार्षिक) पेक्षा खूप कमी आहे.एक वर्ष मोफत पाहू शकतील अॅपल टीव्ही प्लस
 
10 सप्टेंबर नंतर खरेदी केलेले नवीन आयफोन, आयपॅड, आयपॉड टच, मॅक आणि अॅपल टीव्हीच्या ग्राहकांना एक वर्षासाठी अॅपल टीव्ही प्लस सर्व्हीसचे फ्री सबस्क्रिप्शन मिळेल. कंपनीने भारतात 99 रुपये प्रति महिना फॅमिली प्लॅनसोबत अॅपल म्युजिक स्टुडंट प्लॅनदेखील लॉन्च केला आहे, ज्यात स्टूडेंट्सला फक्त 49 रुपये प्रति महिना चार्ज लागेल.

बातम्या आणखी आहेत...