• Home
  • Apple's AI Siri saved the young man's life, car had fallen into frozen river

अमेरिका / तरुण कारसह बर्फाच्या नदीत पडला, अॅपलच्या 'एआय सीरी'ने वाचवला जीव

  • घटना मंगळवारी लोवा शहरात घडली, तरुणाची कार अनियंत्रित होऊन नदीत पडली

दिव्य मराठी वेब टीम

Dec 13,2019 11:38:00 AM IST

लोवा(अमेरिका)- अॅपल कंपनीच्या आर्टिफिशयल इंटेलिजंस सीरीने एका तरुमाचा जीव वाचवला आहे. घटना मंगळवारी अमेरिकेच्या लोवा शहरात घडली. तरुण कारने जात असताना चार्ल्स शहरातील नदीत कार पडली. त्यानंतर त्याने सीरीला सांगून 911 वर कॉल केला. तेव्हा त्याला मदतीसाठी रेस्कूय टीम आली.


मिळालेल्या माहितीनुसार 18 वर्षीय गेल साल्सेडो मंगळवारी उत्तर लोवा एरिया कम्युनिटी कॉलेजला जात होता. तेव्हा त्याची कार अनियंत्रित होऊ वाइनबागो नदीत पडली. नदी पूर्णपणे गोठली होती. गेलने सांगितले की, 'मला काहीच समजत नव्हते काय कराव, तापमान खूप कमी होते आणि मी असहाय्य होतो. मला माझा फोन सापडत नव्हता, तेव्हा मला आठवलं की, सीरीला आवाज जेऊन चालू केले जाऊ शकते. तेव्हा मी सीरीला आवाज देऊन 911 वर कॉल लावला. त्यानंतर अग्निशमन विभागाने रेस्क्यू टीम पाठवली आणि कारची खिडकी फोडून गेलला बाहेर काढले.

X
COMMENT