आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2021 मध्ये येणार अॅपलचा संपूर्णपणे 'वायरलेस आयफोन', फोनला नसेल चार्जिंग पोर्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंपनी संपूर्णपणे वायरलेस फोनच्या टेक्नॉलॉजीकडे वळत आहे

गॅजेट डेस्क- टेक अॅनालिस्ट मिंग-ची क्योने अपल्या रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, 2021 मध्ये अमेरिकेतील टेक कंपनी अॅपल कम्पलीटली वायरलेस आयफोन लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत अॅपलमध्ये चार्जिंग पोर्ट म्हणून अॅपलमध्ये यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळत आले आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, आता कंपनी संपूर्णपणे वायरलेस फोनच्या टेक्नॉलॉजीकडे वळत आहे.



क्योने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, अॅपल हायस्ट एंड आणि हाय एंड मॉडलमध्ये अंतर ठेवणार आहे. ज्यामुळे ग्लोबल मार्केटमध्ये त्यांच्या सर्वात वरच्या मॉडेलची विक्री जास्त होईल. आशा केली जात आहे की, 2021 आयफोन मॉडललासोडून आयफोनच्या टॉप-एंड मॉडल्समध्ये लाइटनिंग पोर्ट नसेल आणि या संपूर्णपणे वायरलेस एक्सपीरियंस मिळेल. 2020 मध्ये अॅपल एकूण 5 आयफोन बाजारात आणू शकते.



रिपोर्टनुसार, पुढील वर्षी लॉन्च होणाऱ्या मॉडल्समध्ये एक 6.7 इंच हाय-एंड आयफोन, दोन 6.1 इंच आयफोन आणि एक एंट्री लेवल 5.4 इंच आयफोन असेल. त्या सर्व फोनमध्ये 6 गीगाहर्ट्ज आणि 5जी एमएम वेव सपोर्ट मिळेल. क्योने सांगितले की, आयफोन एसईला 2020  च्या पहिल्या त्रैमासिकात लॉन्च केले जाऊ शकते. आशा केली जात आहे की, यात 4.7 इंच डिस्प्ले आणि आयफोन 8 प्रमाणेच साइज-डिजाइन असेल. पण, यात जास्त अपडेट्स मिळतील. यात अपेटेड सिंगल कॅमेरादेखील असेल.
 

बातम्या आणखी आहेत...