Home | Maharashtra | Western Maharashtra | Solapur | Application of stay of on chimney distroying has been rejected by high court

चिमणी पाडकाम स्थगिती अर्ज हायकोर्टाने फेटाळला; 'सिद्धेश्वर'ने पर्यायी जागेसाठी मागितली होती मुदत

दिव्य मराठी | Update - Aug 07, 2018, 11:35 AM IST

चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याचा सिद्धेश्वर साखर कारखान्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कारखान्याने पर्याय

  • Application of stay of on chimney distroying has been rejected by high court

    सोलापूर- चिमणी पाडकामाला स्थगिती देण्याचा सिद्धेश्वर साखर कारखान्याचा अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. कारखान्याने पर्यायी जागा शोधण्यासाठी मुदतही मागितली होती. ती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. न्यायमूर्ती एच. सी. धर्माधिकारी, बी. ए. डांगरे यांच्या न्यायालयाने याचिका फेटाळली. विमानसेवेस अडथळा होत असल्याने शासनाने चिमणी पाडण्याचे आदेश दिले आहेत. कारखान्याचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्याकडून चिमणी वाचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सगळ्या वादाच्या कचाट्यात विमानसेवा रखडली आहे.


    सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी विमानसेवेस अडथळा ठरत आहे. त्यामुळे ती पाडण्याबाबत महापालिका व जिल्हा प्रशासनाने कारखान्यास नोटीस दिली होती. महापालिकेचे पथक चिमणी पाडण्यासाठी गेले हाेते. त्यावेळी वाद झाल्यानंतर कारखान्याने तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. याबाबत जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज फेटाळल्यानंतर उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यात आला होता.


    पर्यायी व्यवस्थेची माहिती दिलीच नाही
    चिमणी पाडकाम स्थगितीबाबत २३ जुलै २०१८ रोजी उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने चिमणीची उंची जास्त असल्याचे उच्च न्यायालयात म्हटले होते. कारखान्याने पर्यायी व्यवस्था होईपर्यंत पाडकाम न करण्यासाठी स्थगिती मागितली होती. पण, सुनावणी दरम्यान कारखाना व्यवस्थापनाने काय पर्यायी व्यवस्था केली? याबाबतची माहिती सविस्तर माहिती कारखान्याने सादर केली नाही.

Trending