आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्व प्रकारच्या वाहनांवर १८ टक्के जीएसटी लागू करा, अर्थसंकल्पपूर्व बैठकीत ‘सियाम’ची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - सात्याने घटत्या विक्रीच्या समस्येने ग्रासलेल्या देशातील वाहन उद्याेगाने येत्या जुलै महिन्यात सादर हाेणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये सर्व वाहनांवरील सध्याचा २८ % असलेला वस्तू आणि सेवा कर (जीएसी) कमी करून ताे १८ % करावा, अशी मागणी केली आहे. केंद्रात पुन्हा सत्तेवर आलेले माेदी सरकार आपला पहिला अर्थसंकल्प जुलैमध्ये सादर करणार आहे.


देशातील वाहन उद्याेगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सियाम या संस्थेने प्रदूषण नियंत्रणासाठी जुन्या वाहनांचे रूपांतर नव्या वाहनात करण्यास प्राेत्साहन देण्याच्या संदर्भात केंद्र सरकारने धाेरण जाहीर करावे, अशी मागणी केली आहे. अर्थसंकल्पापूर्वी अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये सियामच्या अधिकाऱ्यांनी या मागणीकडे लक्ष वेधले. वाहन कंपनीच्या एका कार्यकारी अधिकाऱ्याने जीएसटीचे दर कमी केल्यास वाहनांच्या कमी हाेऊ शकतात. परिणामी गेल्या ११ महिन्यांपासून थंड पडलेल्या वाहन उद्याेगातील मागणीला चालना मिळू शकेल, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले.

 

यंदाच्या एप्रिल महिन्यामध्ये वाहनांच्या विक्रीमध्ये १७.०७ टक्क्यांची घसरण झाली असून ती गेल्या आठ वर्षांतील सर्वात माेठी घसरण आहे. या अगाेदर ऑक्टाेबर २०११ मध्ये प्रवासी वाहनांच्या विक्रीमध्ये सर्वाधिक घट झाली हाेती. बाजारातील राेखतेची चणचण आणि निवडणुकांच्या अगाेदर ग्राहकांच्या मागणीत झालेली घट तसेच वाढलेल्या किमतींमुळे वाहनांच्या विक्रीला ब्रेक लागला. अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये सियामने जुनी वाहने भंगारात टाकण्यासाठी सवलतीच्या आधारावर प्राेत्साहन याेजना राबवावी, अशी मागणी केली.

 

देशातील वाहन उत्पादनाला प्राेत्साहन देण्याच्या दृष्टीने व्यावसायिक वाहनांवरील आयात शुल्क सध्याच्या २५ टक्क्यांवरून कमी करून ते २०% केले जावे, अन्य सर्व वाहनांच्या आयात करण्यात येणाऱ्या सुट्या भागांवरील शुल्क१० टक्क्यांवर आणण्याची मागणी करण्यात आली.