आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा निवडणुकीसाठी जळगावचे तब्बल अाठ अधिकारी नियुक्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धुळे - येथील महापालिकेच्या निवडणुकीसाठी २१ अधिकाऱ्यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून निवड करण्यात अाली. त्यात तब्बल १० अधिकारी जळगावचे अाहेत. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या अाहेत. 

 

यावर अामदार अनिल गाेटे यांनी तर थेट मंत्री गिरीश महाजनांकडे संशयाची सुई दाखवत निवडणूक अायोगाकडे दाद मागणार मागण्याची तयारी केली अाहे. तिथेही दखल घेतली नाही तर उच्च न्यायालयात जाऊ, असे त्यांनी म्हटले अाहे. जळगावचे अधिकारी हा याेगायाेग समजावा का, असा प्रश्नही त्यांनी केला अाहे. शहराचे एकूण ७ विभाग करण्यात आले आहेत. तर निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जळगाव जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची संख्या अधिक आहे.

 

जळगाव जिल्ह्यातील ८० टक्के अधिकारी धुळे महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेत सहभागी होत आहेत. हा योगायोग समजावा की, भारतीय जनता पक्षाच्या पालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपविलेल्या पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन यांचे निवडणूक चातुर्य समजावे असा संभ्रम लोकप्रतिनिधींच्या मनात निर्माण होत आहे. प्रत्यक्ष जबाबदारी दिलेल्या ६ अधिकाऱ्यांपैकी जळगाव येथील ४ अधिकारी आहेत. उर्वरित एक मालेगाव व एक धुळे येथील अधिकारी आहे.

 

आश्चर्य म्हणजे धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या व जळगावपेक्षा जवळचा जिल्हा नंदुरबार असताना तसेच नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथील विभागीय कार्यालय असताना अधिकाऱ्याची नियुक्ती न करता जळगाव जिल्ह्यातील ८० टक्के अधिकारी नियुक्त केले आहेत. याकरिता निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार आहे. त्याची दखल न घेतली गेल्यास उच्च न्यायालयाचे दरवाजे ठाेठावणार असल्याचे पत्रकात आमदार अनिल गोटे यांनी म्हटले आहे. 
महापालिका आयुक्त निवडणूक अधिकारी असून निवडणूक अधिकारी व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी महापालिका आयुक्तांना प्राधिकृत करण्यात आले आहे. यात सहायक निवडणूक निर्णय अधिकारी या पदावर २१ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली अाहे. 

 

हे अधिकारी ठेवणार निवडणुकीवर लक्ष 
जळगाव जिल्ह्यातील १० अधिकारी महापालिकेच्या निवडणुकीवर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून लक्ष ठेवणार अाहेत. त्यात चाळीसगाव उपविभागीय अधिकारी शरद पवार, अमळनेर उपविभागीय अधिकारी संजय गायकवाड, जळगाव विशेष भूसंपादन रामसिंग सुलाने, जळगाव तहसीलदार राहुल जाधव, जळगाव संगायाे श्वेता संचेती, जळगाव कडाचे मनाेज देशमुख, भुसावळ न.पा.चे राेहिदास दाेरकुळकर, जळगाव संगायाे तहसीलदार सुनील सैंदाणे, चाळीसगाव मुख्याधिकारी अनिकेत मानाेरकर, भडगाव मुख्याधिकारी विकास नवाळे, पाराेळा तहसीलदार प्रशांत पाटील, पाराेळा मुख्याधिकारी सचिन माने, पाचाेरा मुख्याधिकारी साेमनाथ अाढाव यांचा यात समावेश अाहे.त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली अाहे, असे दिसून येते.

बातम्या आणखी आहेत...