आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Appointing Ministerial Appointments Only For Political Gain Is Morally Inappropriate

केवळ राजकीय लाभासाठी मंत्रिपदी नियुक्त्या नैतिकदृष्ट्या अयोग्यच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : इतर पक्षांतून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मंत्रिपदी विराजमान झालेले राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर आणि अविनाश महातेकर यांच्या मंत्रिपदाला आव्हान देणारी याचिका मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी फेटाळली. घटनात्मकदृष्ट्या या नियुक्त्या योग्य असल्या तरी राजकीय लाभासाठी झालेल्या या नियुक्त्या नैतिकदृष्ट्या चुकीच्या असल्याची टिप्पणी हायकोर्टाने केली. अशा निष्ठा बदलांतून राजकीय लाभ घेणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी मतदार पुरेसे सक्षम आहेत, असेही हायकोर्टाने म्हटले आहे.

न्या. एस. सी. धर्माधिकारी, न्या. जी. एस. पटेल यांच्या न्यायपीठाने उपरोक्त नेत्यांच्या मंत्रिपदाविरुद्ध दाखल याचिका फेटाळताना म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपला मोठे बहुमत मिळाले. कदाचित यामुळे इतर पक्षांतील नेत्यांना पक्षांतराची प्रेरणा मिळाली असावी. मूळ काँग्रेसचे व माजी विरोधी पक्षनेते विखे पाटील यांना फडणवीस मंत्रिमंडळात गृहनिर्माण, राष्ट्रवादीतून आलेले क्षीरसागर यांच्याकडे रोहयो तर मूळ रिपाइंचे महातेकर यांना सामाजिक न्याय मंत्रालयात राज्यमंत्रिपद देण्यात आले होते.

उदयनराजेंचा भाजप प्रवेश : राष्ट्रवादीचे सातारा येथील खासदार उदयनराजे भाेसले शनिवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.


विखे, क्षीरसागर, महातेकरांना मंत्रिपद देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका फेटाळली
राष्ट्रवादीला रामराम; भास्कर जाधव १५ वर्षांनंतर पुन्हा शिवसे
नेत
मुंबई : काेकणातील गुहागरचे अामदार भास्कर जाधव यांनी शुक्रवारी दुपारी मुंबईत 'माताेश्री'वर जाऊन शिवसेनेत प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवबंधन बांधले. तत्पूर्वी अाैरंगाबादेत जाऊन जाधव यांनी अामदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीला रामराम ठाेकला. पाेलिस खात्यातून निवृत्ती घेतलेले 'एन्काउंटर स्पेशालिस्ट' प्रदीप शर्मा यांनीही सायंकाळी शिवसेनेत प्रवेश केला.

जाधवांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी हरिभाऊ बागडे दुचाकीवर!
आैरंगाबाद : राष्ट्रवादीचे आमदार भास्कर जाधव आमदारकीचा राजीनामा देण्यासाठी विशेष विमानाने औरंगाबादेत आले आणि तो स्वीकारण्यासाठी शुक्रवारी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी चक्क दुचाकीवर प्रवास केला. विधानसभा अध्यक्षांकडे तातडीने स्वत: जाऊन राजीनामा द्यावा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुचवले. त्यासाठी खास विमानही दिले. शुक्रवारी सकाळी ९ वाजता जाधव चिकलठाणा विमानतळावर उतरले. तेथून कुंभेफळ येथील भाजप कार्यालयावर जाऊन थांबले. दरम्यान, बागडे कुंभेफळकडे निघाले. तेव्हा रेल्वे फाटक बंद होते. वेळ वाचवण्यासाठी बागडे चक्क एका कार्यकर्त्याच्या दुचाकीवर बसून भाजप पदाधिकाऱ्याच्या कार्यालयात दाखल झाले. जाधव राजीनामा देऊन मुंबईकडे तर बागडे मतदारसंघाकडे रवाना झाले.

शिवसेनेची यादीही आता मुख्यमंत्रीच 'ठरवणार' : उद्धव ठाकरेंचा टोला
'माताेश्री'वर पत्रकारांनी युतीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरेंवर प्रश्नांचा भडिमार केला. तेव्हा ठाकरेंनी पत्रकारांची विकेट घेतली. ते म्हणाले. 'युतीची चर्चा अंतिम टप्प्यात अाहे. मी मुख्यमंत्र्यांना जागावाटपाबाबत वेगळा मार्ग सुचवला अाहे. शिवसेनेची यादीही तुम्हीच तयार करून द्या. मी ती यादी शिवसैनिकांपुढे ठेवेन, असे मी मुख्यमंत्र्यांना सांगितले अाहे.' युती आणि उमेदवारीबाबत ठाकरेंच्या या उपराेधिक विधानाला पत्रकारांनीही हसून दाद दिली.