आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी मराठा आरक्षणास अखेर मंजुरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशासाठी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ‘एसईबीसी’ आरक्षणाची सवलत पूर्वलक्षी प्रभावाने उपलब्ध करून देण्याच्या अध्यादेशावर राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी साेमवारी स्वाक्षरी केली. त्यामुळे आजपासूनच हा कायदा लागू झाल्याने मराठा विद्यार्थ्यांचा आरक्षणानुसार प्रवेशाचा मार्ग माेकळा झाला. दरम्यान, या अध्यादेशावर राज्यपालांनी सही करू नये म्हणून खुल्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सोमवारी सकाळी राजभवनासमोर निदर्शनेही केली.

 

३० मेपर्यंत मुदतवाढ?
अध्यादेशाच्या मंजुरीमुळे आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी कोट्यातून विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणे सुलभ हाेईल. सरकारने वैद्यकीय पदव्युत्तरच्या जागा वाढवून मिळाव्यात यासाठी केंद्राकडे प्रस्ताव पाठवला असून प्रवेशासाठी ३० मेपर्यंत मुदत वाढवून द्यावी, असा अर्ज कोर्टाकडे केला आहे. तसेच अध्यादेशाविरोधात याचिका दाखल झाल्यास त्यावर निर्णय देण्यापूर्वी सरकारची बाजू ऐकावी यासाठी कॅव्हेटही करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...