- Marathi News
- National
- AR Rahman’s Teen Student Lydian Nadhaswaram Wins The US Reality Show The World’s Best
A.R. रेहमानच्या स्टूडंटने अमेरीकेत उंचावला भारताचा झेंडा, रिअॅलिटी शो 'द वर्ल्ड्स बेस्ट'मध्ये पटकावला पहिला क्रमांक
नॅशनल डेस्क- चेन्नईचा पियानोवादक लिडियन नादस्वरमने अमेरिकेचा रिअॅलिटी शो 'द वर्ल्ड्स बेस्ट'चा विजेतेपद मिळवले आहे. तमीळ संगीतकार दर्शन सतीश यांचा मुलगा, लिडियनने दक्षिण कोरियाच्या कुक्कीवोन उर्फ द फ्लाइंग ताइक्वांडो मास्टर्सला हरवून हा मानाचा किताब मिळवला. त्यासोबत त्याला 1 मिलियन अमेरीकी डॉलरचे बक्षीस देण्यात आले. लिडियन चेन्नईमध्ये ऑस्कर अवॉर्ड विनर ए.आर. रेहमान KM Music Conservatory चा विद्यार्थी आहे. ‘द वर्ल्ड्स बेस्ट’ किताब जिंकल्यानंतर लिडियन प्रतिक्रीया देताना म्हणाला- "यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे." आपल्या शिष्याच्या कामगिरीवर रेहमानने त्याचे कौतुक केले आहे.