आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अरबी Prince ने मित्रांना दिले 42 लाख रुपयांचे डिनर, एका डिशची किंमत सव्वा बारा लाख

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क - अरेबियन राजघराणे आणि राजकुमार आपल्या शाही शौकांसाठी ओळखले जातात. यात महागड्या गाड्यांपासून भव्य महालांपर्यंत प्रत्येकाचा थाट दाखवण्याचा अंदाज वेगळाच आहे. हेच राजकुमार जेव्हा मित्रांना पार्टी देतात तेव्हा किती खर्च होतो, याचे एक उदाहरण समोर आले आहे. सोशल मीडियावर या निनावी अरबी प्रिन्सच्या सर्वत्र चर्चा आहेत. त्याने आपल्या 8 मित्रांना चीनमध्ये जंगी पार्टी दिली. त्या एका रात्रीच्या जेवणाचे बिल 4 लाख युआन अर्थात तब्बल 42.30 लाख रुपये झाले आहे. 


एका डिशची किंमत 12.36 लाख रुपये
चीनच्या शांघाय येथील एका हॉटेल मालकाने राजकुमारच्या नावाचा खुलासा केला नाही. परंतु, एक बिल सार्वजनिक करताना ते दुबईच्या एका राजकुमाराच्या नावे काढण्यात आले असे म्हटले आहे. या राजकुमारने आपल्या 8 चिनी मित्रांसोबत डिनर आणि ड्रिंकची पार्टी केली. त्यातील सर्वात महागडी डिश वाइल्ड लार्ज येलो क्रॉकर होती. त्याची किंमत जवळपास 12 लाख 36 हजार रुपये इतकी आहे. या व्यतिरिक्त 1.35 लाख रुपयांचा शेक, 1.78 लाखांचा साऊटीड क्रॉकोडाइल टेल सूप यांचा समावेश आहे. या बिलमध्ये ड्रायव्हरासाठी सुद्धा जेवण होते. त्या सर्वांवर एकूण 4 लाख रुपयांचा फक्त सर्व्हिस चार्ज लागला आहे. 

बातम्या आणखी आहेत...