आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना निसर्ग अनुभवू द्या...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरती विकास पाटील-महाजन  

शाळेतील प्रोजेक्ट्स, ट्रिपसाठी आपण कितीतरी मटेरियल आणि पैसा खर्च करतो, पण त्यासोबत जर एखादी अॅग्रिकल्चर व्हिजिट केली तर शेती, त्यातील  अवजार, मेहनत, पिकांचं अंकुरणंपासून शेती उत्पादनापर्यंत सगळंच मुलं प्रत्यक्ष अनुभवतील
सुट्या सुरू झाल्या की निसर्गरम्य ठिकाणी जाण्याचा विचार प्रत्येक जण करत असतो. शहरांमध्ये उंच उंच बिल्डिंग, जिथे कधी सूर्य दिसत नाही, सुंदर आकाश नजरेसही पडत नाही, तिथे निसर्गाचं सौंदर्य जाणवणं थोडं उघडच आहे. सूर्यास्त आणि सूर्योदय फक्त चित्रातच काढणाऱ्या आजच्या पिढीला सोनेरी आकाश कधी बघताच येत नाही. मग निदान सुटीच्या काळात तरी आपण निसर्गाच्या कुशीत थोडा वेळ घालवावा असं वाटणं साहजिकच आहे. 

शाळा-कॉलेजमध्ये आपण सर्व प्रकारचे शिक्षण आज मिळवतो. अगदी उपजीविकेचे, व्यावसायिक खेळाचे सर्व प्रकारचे प्रशिक्षण शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी इथे उपलब्ध असते. अगदी मूल्यवर्धन आणि पर्यावरण विषयसुद्धा आपण अतिशय जागरूकतेने मुलांपर्यंत आणि जनतेपर्यंत पोहोचवतो. प्रदूषणाचे दुष्परिणाम व ते कमी करण्याचे उपाय सांगतो, पण ते किती अमलात आणतो? ज्यांनी कधी  निसर्गाचं अंकुरणं, बहरणं, फुलणं, वाऱ्यावर डोलणं, वादळासमोर टिकून राहणं ज्या मुलांनी कधी अनुभवलं नाही ते त्याच्या रक्षणासाठी कसे झटतील? त्या वरच्या घावाने कसे तळमळतील? शाळेतील प्रोजेक्ट्स, ट्रिपसाठी आपण कितीतरी मटेरियल आणि पैसा खर्च करतो, पण त्यासोबत जर एखादी अॅग्रिकल्चर व्हिजिट केली तर  शेती, त्यातील  अवजार, मेहनत, पिकांचं अंकुरणंपासून शेती उत्पादनापर्यंत सगळंच मुलं प्रत्यक्ष अनुभवतील. त्यातून त्या शेतकऱ्यालाही काही अर्थसाह्य शाळेकडून उपलब्ध होईल. शेती व्यवसायाबद्दल असलेले अनेक प्रश्न व पूर्वग्रह  यातून दूर होतील. कॉलनीत गणपती, १५ ऑगस्ट इत्यादी प्रसंगी पारितोषिक रूपात रोपे देऊन मोकळ्या जागी त्यांचे रोपण करू शकतो. जाणाऱ्या गणपतीला ‘पुढच्या वर्षी लवकर या’ हे सांगताना तो परत येईपर्यंत त्या रोपांचं संगोपन करण्याची जबाबदारी आपण मुलांना वाटून देऊ शकतो. 
नुकतीच दुष्काळ व पूरग्रस्त स्थिती आपण अनुभवली आहे. अशा ठिकाणी भेट देऊन आपण तेथील जमीन, वृक्ष, झालेले नुकसान व त्यामागील करणे आपण मुलांना समजावू शकतो. शाळेतील पटांगणात रोप, बी पेरून मुलांचा आनंद अनुभवू शकतो.  गच्चीवर, बाल्कनीच्या कुंडीत रोपे लावून आपण ते वाढवण्याची जबाबदारी आपण मुलांना देऊन त्यांना निसर्गाच कलेकलेने फुलणं अनुभवू शकतो. साऱ्या सहज सोप्या गोष्टीनी आपण सुटीत निसर्गाच्या सान्निध्यात जाण्यापेक्षा निसर्गच आपल्या जवळ आणू शकत नाही का?


लेखिकेचा संपर्क -  8850364
694