आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिलेशनशिप : प्रत्येक ठिकाणी गर्लफ्रेंडसोबत दिसणारा अरबाज EX-वाइफ मलाइकच्या योगा सेंटर लाँचला पोहोचला एकटा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मलायका अरोराने मुंबईत स्वतःचे योगा सेंटर लाँच केले आहे. खास गोष्ट म्हणजे या कार्यक्रमाला मलायकाचा पुर्वाश्रमीचा पती अरबाज खानसुद्धा पोहोचला होता. घटस्फोटानंतर कायम गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत दिसणारा अरबाज, पुर्वाश्रमीच्या पत्नीच्या सेंटर लाँच इव्हेंटमध्ये मात्र एकटा आला होता. 


15 वर्षांचा अरहान दिसला आईसोबत.. 
- मलायकाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर फिटनेस सेंटरचे काही फोटोज पोस्ट केले आहेत. फोटो शेअर करुन मलायकाने लिहिले,  'Today my dream becomes a reality 🙏 thank u @sarvesh_shashi @exceedentertainment for making this journey so beautiful and enriching ... today @thedivayoga studio comes to life.come experience it and be transformed'.

- यावेळी 15 वर्षीय अरहानची त्याचे वडील अरबाजसोबत खास बाँडिंग बघायला मिळाली. घटस्फोटानंतर अरहान आई मलायकासोबत राहतो. यावेळी मलायकाने मुलगा आणि पुर्वाश्रमीच्या पतीसोबत मीडिया फोटोग्राफरला पोज दिले. 
- मलायकाने यावेळी काही योग मुद्राही करुन दाखवल्या. या कार्यक्रमाला मलायकाची बेस्ट फ्रेंड करिश्मा कपूर, धाकटी बहीण अमृता अरोरा, तिचे पती आणि मुले हजर होती. मलायकाचे आईवडीलही यावेळी उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...