आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबॉलिवूड डेस्क : अरबाज खान अपकमिंग चित्रपट 'श्रीदेवी बंगलो' मध्ये एका बॉलिवूड अभिनेत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचे म्हणणे आहे की, सुरुवातीला तो यामुळे चिंतीत होता कारण चित्रपटाचा विषय सुपरस्टार श्रीदेवी यांच्या मृत्यूच्या अँगलला जोडून पहिले जात होता. अरबाज म्हणाला, "जेव्हा त्यांनी (मेकर्स) मला चित्रपट ऑफर तेव्हा मी त्यांना विचारले होते चित्रपटाच्या कथेमध्ये श्रीदेवीजींसोबत झालेल्या दुर्दैवी घटनेशी संबंधित तर काही नाही ना ? उत्तरात त्यांनी याला पूर्णपणे नकार दिला होता."
खूप आधी रजिस्टर्ड झाले होते टायटल...
अरबाज खान पुढे म्हणाला, "त्यांनी सांगितले होते या कथेचा सुपरस्टार श्रीदेवी यांच्याशी काहीही संबंध नाही आणि त्यांनी खूप काळ आधीच चित्रपटाचे टयइटल रजिस्टर्ड केले होते. त्यांनी मला अश्वस्त केले की, त्यांनी मीडियाला याबद्दल आधीच सर्वकाही सांगितले आहे. त्यामुळे मी निश्चिंत राहायला हवे की, टायटल त्यासारखे असल्याचा अर्थ असा नाही की, चित्रपटाचा संबंधित घटनेशी काहीही संबंध नाही."
वादाची चिंता मेकर्सने केली पाहिजे - प्रिया...
फिल्ममध्ये प्रिया प्रकाश वॉरियर लीड रोल करत आहे. वादाबद्दल ती म्हणाली, "ही डायरेक्टर आणि प्रोड्यूसरची चिंता असली पाहिजे. कारण मला त्यांनी जी भूमिका दिली ती मी साकारली. जाणून बुजून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा उद्देश्य नव्हता." डायरेक्टर प्रशांत माम्बुलीच्या या चित्रपटाच्या कहाणीमध्ये श्रीदेवी नावाची एक सक्सेसफुल अभिनेत्री आहे, ज्यांचे जीवन एकटेपणाचे शिकार होते.
यामुळे झाला चित्रपटाबद्दल वाद...
चित्रपटाचा ट्रेलर जानेवारीमध्ये रिलीज झाला होता. याच्या शेवटामध्ये प्रिया प्रकाशचे पात्र बाथटबमध्ये मारताना दाखवले गेले आहे. फेब्रुवारी 2018 मध्ये सुपरस्टार श्रीदेवी यांचा मृत्यूदेखील दुबईच्या एका हॉटेलच्या बाथटबमध्ये बुडाल्यानेच झाला होता. ट्रेलर आणि श्रीदेवी यांच्या आयुष्यातील याच समानतेमुळे चित्रपटाबद्दल वाद सुरु झाला होता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.