आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'GF'सोबत पार्टी करताना दिसला सलमान खानचा भाऊ अरबाज, एक्स-वाइफची बहीणही दिसली सोबत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई: सलमान खानचा भाऊ अरबाज खानचे काही फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो आपली सो-कॉल्ड गर्लफ्रेंड जॉर्जिया एंट्रियानीसोबत दिसतोय. मुंबईमध्ये संजय कपूरच्या घरी झालेल्या पार्टीत सहभागी होण्यासाठी तो आला होता. तेव्हा हे फोटोज क्लिक करण्यात आले. सोहेल खानही पत्नी सीमासोबत पार्टीमध्ये पोहोचला. मे 2017 मध्ये अरबाजचा मलायका अरोडासोबत घटस्फोट झाला आहे आणि तेव्हापासून तो जॉर्जियाच्या जवळ आल्याचे दिसतेय. 

 

बॉलिवूड अॅक्ट्रेस आहे जॉर्जिया 
जॉर्जिया एंड्रियानी मॉडल आहे आणि बॉलिवूड अॅक्ट्रेस आहे. ती जुलै 'गेस्ट इन लंडन' या 2017 मध्ये आलेल्या चित्रपटात दिसली होती. यामध्ये कार्तिक आर्यन, कृती खरबंदा आणि परेश रावल प्रमुख भूमिकेत आहेत. गेल्यावर्षी एका आयपीएल मॅच दरम्यान दोघं एकत्र दिसले होते. तेव्हापासून दोघांमधून एकानेही आपल्या नात्याविषयी स्पष्टीकरण दिलेले नाही. 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...