आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आंख मारे\' आणि \'रश्क-ए-कमर\' वर जबदस्त नाचली अरबाज खानची गर्लफ्रेंड, सोशल मीडिया यूजर्स म्हणाले - \'दबंग 3\' मध्ये आयटम सॉन्ग करण्यासाठी तयार राहा\'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीचा हॉट डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. झाले असे की, जॉर्जियाने सोशल मीडियावर दोन व्हिडीओज शेयर केले आहेत. एका व्हिडिओमध्ये ती 'बादशाहो' फिल्मच्या 'रश्के कमर' आणि दुसऱ्यामध्ये 'सिंबा' च्या 'आंख मारे' या सॉन्गवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.  

खूप मजेदार आहे हा व्हिडीओ...
व्हिडिओमध्ये जॉर्जिया डान्स प्रॅक्टिस करतांना दिसत आहे. तिच्या डान्समध्ये बेली डान्सची झलक पाहायला मिळाली. यामध्ये ती सर्वच स्टेप्स खूप सुंदरपणे करत होती. तसेच दुसऱ्या व्हिडिओमध्ये जॉर्जिया 'आंख मारे' सॉन्गवर डान्स करताना दिसली. यामध्ये तिच्यासोबत अजून एक साथीदार पण आहे आणि तिच्यासोबत मिळून ती स्टेप्स करत आहे. 

पर्सनल इंस्टाग्राम अकाउंटवर शेयर केला व्हिडीओ...  
जॉर्जियाने आपला हा डान्स व्हिडीओ आपल्या पर्सनल इंस्टा अकाउंटवर शेयर केला आहे. यासोबत तिने कॅप्शन लिहिले आहे, "माझ्या आवडीचे गाणे मी माझ्या पद्धतीने एन्जॉय करत आहे." यासोबतच ती म्हणाली की, डान्स स्वतःला खुश आणि एनर्जेटिक ठेवण्याचे सिक्रेट आहे. यामुळे सोशल मीडिया यूजर्स तिच्या डान्सचे खूप कौतुक करत आहेत तर काही जण म्हणत आहेत की, अजून प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तसेच एका यूजरने लिहिले, "'दबंग 3' मध्ये आयटम सॉन्ग करण्यासाठी तयार होऊन जा". 

बातम्या आणखी आहेत...