आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक - मालेगाव बॉम्बस्फोटात वापरण्यात आलेली भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंहची “एलएमएल फ्रीडम’ ही दुचाकी विशेष न्यायालयात पंचांनी ओळखली.
खटल्यातील पंच शकील अहमद मोहंमद हनीफ खलिफा यांची साक्ष घेण्यासाठी २ दुचाकी आणि पाच सायकली असा मुद्देमाल न्यायालयात आणण्यात आला होता. ही वाहने कोर्टरूममध्ये नेणे शक्य नसल्याने न्यायालयाच्या इमारतीखाली टेम्पोतच ठेवण्यात आली होती. त्यामुळे न्यायाधीश विनोद पाडाळकर यांनी इमारतीखाली येऊन टेम्पोत शिरून मोबाइलच्या टॉर्चने त्यांची तपासणी केली आणि ही “तीच’ वाहने असल्याचा पंचांचा जबाब घेतला.
२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातल्या भिक्कू चौकात झालेल्या बॉम्बस्फोटात एमएच १५-४३७२ क्रमांकाची एलएमएल फ्रीडम ही दुचाकी वापरण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. या दुचाकीचा चेसिस क्रमांकही खोडण्यात आल्याचे स्फोटानंतरच्या काही तासांत घटनास्थळी करण्यात आलेल्या तपासातून पुढे आले होते. त्याचा पंचनामा करताना उपस्थित पंच शकील अहमद यांची न्यायालयात साक्ष झाली. या वेळी घटनास्थळी उभ्या दोन दुचाकींसह ५ सायकलीही न्यायालयात आणण्यात आल्या होत्या. मात्र, हा मुद्देमाल कोर्टरूममध्ये आणणे शक्य नसल्याने न्या. पाडाळकरांनी स्वत: खाली येत पाहणी केली.
समीर कुलकर्णीचीच हजेरी
मंगळवारी आरोपी प्रज्ञासिंहचे वकील या पंचांची उलट तपासणी घेणार आहेत. ही या खटल्यातील १२४ वी साक्ष सुरू आहे. नेहमीप्रमाणे या वेळीही समीर कुलकर्णी हे एकमेव आरोपी हजर होते. खटल्यादरम्यान हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश अन्य आरोपींनी मात्र धाब्यावर बसवले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.