आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील पहिली सर्वात हायटेक इलेक्ट्रीक बाइक, तुमच्या बोलण्यावर करेल काम, 274km चा नॉन स्टॉप मायलेज

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅटो डेस्क - ब्रिटिश अॅटो कंपनी आर्क व्हेइकल्सची नवी इलेक्ट्रीक मोटरसायकल आतापर्यंतची सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली आहे. आर्क वेक्टर मोटरसायकल कार्बन स्ट्रक्चरवर काम करते. त्यामुळे वजन कमी राहते. ही इलेक्ट्रीक पॉवर सेलच्या एनर्जीद्वारे चालते. यामुळे प्रदूषण होत नाही. कमाल वेगमर्यादा 320 किमी आहे. 


हेलमेटमध्ये कॅमेरादेखिल 
ही मोटरसायकल खास जॅकेट आणि हेल्मेटसह येते. झेनिथ कंपनीच्या या खास हेल्मेटच्या समोरच्या भागात  (वायजर) स्पीडसह नेव्हीगेशनही दिसते. हेलमेटमध्ये रियर व्ह्यू कॅमेराही आहे. तसेच सोबत ओरिजनल जॅकेटही आहे. हे डिजिटली कनेक्ट होते आणि रायडरला धोक्याबाबत सूचना देते. स्पीड जास्त असेल तरीही हे इशारा देते. 


व्हाइस कमांद्वारे ऑपरेट होइल बाइक 
- टाटा मोटर्सच्या मालकीच्या लँड रोव्हरने आर्क इलेक्ट्रीक मोटरसायकलममध्ये गुंतवणूक केली आहे. आर्क इलेक्ट्रीक सुपरबाइक 2018 EICMA मोटरसायकल शोमध्ये सादर करण्याच आली आहे. 


- ही आजवरची सर्वात अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी असलेली बाइक असल्याचे म्हटले जात आहे. 
- एकदा चार्ज झाल्यानंतर 274km धावेल. 
- केवळ 2.7 सेकंदात ती 0 ते 100 किमीचा वेग पकडले. 
- ही पहिली ह्युमन मशीन इंटरफेस (HMI) असलेली बाइक आहे. 
- एका कास डिझाइन केलेल्या जॅकेटसह बाइक मिळते. त्याद्वारे रायडरला सूचना मिळतात. 
- याबरोबर एक अॅडव्हान्स हेल्मेटही मिळते. 
- या हेल्मेटमध्ये बॅटरीची टक्केवारी, वेग अशा अनेक बाबींचा डिस्प्ले असेल. 
- हेल्मेटमध्ये रियर कॅमेरा लावलेला असेल. व्हाइस कमांडद्वारे ऑपरेट करता येईल. 
- व्हाइस कमांडद्वारेहीते कंट्रोल करता येते. 
- कंपनी अशा फक्त 399 बाइक तयार करणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...