आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Archaeological Survey Of India: The 2000 year old Currency Found In The Baghpat Of UP

शेतात आढळला 2000 वर्षे जुना खजिना, छोट्या-छोट्या मातीच्या भांड्यांमध्ये होती नाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बागपत, यूपी - बागपत जिल्ह्याच्या खपराना गावात 2000 वर्षे जुनी नाणी आढळली आहेत. ही नाणी कुषाणकालीन राजा वासुदेवने चलनात आणली होती. तांब्याची ही नाणी मातीच्या छोट्या-छोट्या भांड्यांमध्ये आढळली. 'शहजाद राय शोध संस्थान'चे संचालक अमित राय जैनने ऐतिहासिक महत्त्व असलेल्या या परिसराचा सर्व्हे केला. याचा अहवाल आता भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण(ASI)ला पाठवण्यात येणार आहे.

 

- खपराना गावात 100 बीघाहून जास्त जमिनीवर प्राचीन टेकड्या आहेत. सर्वेक्षणादरम्यान येथून मातीची मोडकी-तोडकी भांडी, महिलांचे दागिने, मुलांची खेळणी, खाण्यापिण्याच्या वस्तू ठेवण्यासाठीची भांडीही आढळली.
- इतिहासकार अमित राय जैन हे एएसआयला खपराना गावात उत्खनन करण्यासाठी पत्र लिहिणार आहेत. जेणेकरून येथे दफन असलेली प्राचीन संस्कृती जगासमोर येईल.

 

नाण्यांबाबत...
ही नाणी राजा वासुदेवाने 200-225 एडी (1800-2000 वर्षे) आधी जारी केली होती. एका नाण्याचे वजन तब्बल 7-8 ग्रॅम आणि साइज 23 मिमी आहे. नाण्याच्या एका बाजूला खुद्द राजा वासुदेव डोक्यावर मुकुट घातलेले दिसत आहेत. त्यांच्या एका हातात त्रिशूळ आहे. तर दुसऱ्या हातात यज्ञात आहूति टाकताना दिसत आहेत. नाण्याच्या दुसऱ्या बाजूला भगवान शिव डमरू व त्रिशूळ हातात घेऊन नंदीवर विराजमान आहेत.

 

कुषाण काळाबद्दल...
कुषाण साम्राज्य उत्तर-पूर्व भारत तसेच सध्याच्या अफगाणिस्तानापर्यंत पसरलेले होते. भारतीय कला जगताचे परिपक्व युग येथूनच सुरू झाल्याचे मानले जाते. हुविष्कनंतर वासुदेव कुषाण साम्राज्याचा राजा बनला होता. त्याच्या नाण्यांवर शिव आणि नंदीच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. तथापि, असे म्हटले जाते की, राजा वासुदेवाच्या शासन काळातच कुषाण साम्राज्याचे पतन सुरू झाले होते.

 

 

बातम्या आणखी आहेत...