आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपराजधानीत कस्तुरचंद पार्कवरील खोदकामात सापडल्या पुरातन ताेफा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - येथील कस्तुरचंद पार्कवर सुरू असलेल्या खोदकामात गुरुवारी ऐतिहासिक काळातील तोफा सापडल्या. उपराजधानीत मध्यभागी असलेल्या कस्तुरचंद पार्कचे ऐतिहासिक महत्त्व आहे. कस्तुरचंद पार्कला ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. राजकीय सभा आणि भव्यदिव्य प्रदर्शनीसाठी कस्तुरचंद पार्क ओळखले जाते. महापालिका आणि बांधकाम विभागातर्फे कस्तुरचंद पार्कचे सौंदर्यीकरण सुरू आहे. त्यासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामात या तोफा सापडल्या. यासंदर्भात इतिहासकार भा. रा. अंधारे यांच्याशी संपर्क साधला असता या तोफा ब्रिटिश काळातील असल्या पाहिजे, असे ते म्हणाले. अधिक निष्कर्ष अभ्यासाअंती सांगता येतील. मात्र, नागपूरकर भोसले आणि ब्रिटिश काळात तोफा उपयोगात आणल्या जात होत्या, असे अंधारे म्हणाले. 

कस्तुरचंद पार्क मध्य रेल्वेच्या मुख्य स्थानकापासून फक्त १ किमी अंतरावर आहे. १२ एकर परिसरात पसारा आहे. 
 

डागांकडून जमीन दान
दिवाणबहादूर सर कस्तुरचंद डागा यांनी ही जागा राज्य सरकारला दान म्हणून दिली. राजस्थानातील बिकानेर येथून नागपुरात आलेल्या कस्तुरचंद डागा यांनी नागपूरपासून ते रंगूनपर्यंत आणि कराचीपासून ते ढाक्यापर्यत आपल्या उद्योगाचा विस्तार केला. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालाही कळू नये इतक्या व्रतस्थतेने अगणित दाने दिली. कस्तुरचंद पार्कलाही नागपूरकर जनतेसाठी दान दिले. त्यांच्याविषयी कृतज्ञता म्हणून त्यांचेच नाव देण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...