आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरातत्वशास्त्रज्ञांनी 3000 वर्ष जुने शहर शोधले, सिकंदरचे अवशेष मिळण्याची शक्यता   

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्खननात प्राचीन मंदिर, नाणे, भांडे आणि शस्त्रे सापडली
  • सिकंदर इ.स.पू. 326 मध्ये आपल्या सैन्यासह तत्कालीन भारताच्या सीमावर्ती भागात आला होता

इस्लामाबाद - पाकिस्तान आणि इटलीच्या पुरातत्वशास्त्रज्ञांनी तीन हजार वर्षे जुने शहर शोधले आहे. दोन्ही देशांचा चमूने उत्तर-पश्चिम पाकिस्तानात संयुक्तरित्या खोदकाम केले. तज्ज्ञांनी या उत्खननात सिंकदरचे अवशेष मिळण्याची शक्यता वर्तवली आहे.  सिकंदरने येथे अनेक किल्ले बांधले होते

पाच हजार वर्षे जुनी सभ्यता आणि कलाकृतींसाठी प्रसिद्ध असलेले खैबर पख्तूनख्वा भागातील स्वात जिल्ह्यात 'बेजीरा' नावाच्या शहरे सापडले आहे. उत्खननात प्राचीन काळातील मंदिर, नाणे, स्तूप, भांडे आणि शस्त्रे आढळली आहेत.  तज्ज्ञांचे मानने आहे की, सिकंदर इ.स.पू 326 मध्ये आपल्या सैन्यासोबत तत्कालीन भारताच्या सीमावर्ती 'स्वात' (आताचे पाकिस्तान) भागात आला होता. सिंकदरने ओडीग्राम येथे झालेल्या युद्धात विरोधकांना हरवले आणि बेजीरा शहर आणि किल्ल्याची उभारणी केली होती. तज्ज्ञांना या उत्खननात सिंकदरच्या आधीही शहरात जनजीवन असल्याचे पुरावे मिळाले. या शहरात सिंकदरपूर्वी इंडो-ग्रीक, बौद्ध, हिंदू लोक राहत होते. 
माहितीनुसार, इटालियन आर्कियोलॉजिस्ट मिशन (आयएसएमईओ) स्वात जिल्ह्यातील बारीकोटमध्ये 1984 नंतर बेजीराच्या प्राचीन शहरात खोदकाम करत आहेत. 1980-90च्या दशकात इ.स.पूर्व दुसऱ्या शतकातील राजा मेनांडर प्रथम(मिलिंद प्रथम)च्या काळातील एका इंडो-ग्रीक शहराचा शोध लागला होता. 
 

बातम्या आणखी आहेत...