आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहीरापोलिस- दक्षिण तुर्कस्तानमधील शहरात एक प्राचीन मंदिर 'नरकाचा दरवाजा' नावाने प्रसिद्ध आहे. या मंदिरात अनेक वर्षांपासून होणाऱ्या गूढ मृत्यूमुळे हे नाव पडले आहे. या मंदिराच्या संपर्कात येणारे पशु-पक्षी अचानक मृत्यू पावतात. या मंदिराविषयी असे म्हणतात की, मंदिरात असलेल्या युनानी देवतांच्या विषारी सापांमुळे येथे येणाऱ्यांचा मृत्यू होतो पण शास्त्रज्ञांनी शोध घेतल्यानंतर या मंदिराचे सत्य समोर आले आहे.
ऑक्सिजनच्या कमतरतेमूळे होत आहे मृत्यू
> ही गोष्ट आहे तुर्कस्तानच्या हिरापोलिस शहरातील प्राचीन मंदिराची. तिथे घडणाऱ्या विचित्र घटनांमिळे लोक मंदिराला नरकाचा दरावाजा म्हणतात.
> ग्रीक आणि रोमन काळातसुद्धा मंदिरांच्या जवळ गेल्यानंतर लोकांचे शिरच्छेद केले जात होते. त्यामूळे मृत्यूच्या धाकाने लोक इथे येण्यासाठी घाबरत होते.
> या मंदिरावर अनेक वर्षे संशोधन केल्यानंतर शास्त्रज्ञांनी सांगितले की, मंदिराच्या पृष्ठभागातून बाहेर निघणाऱ्या कार्बन डाय ऑक्साइड गॅसमुळे लोकांचा मृत्यू होत आहे.
> अनेक वर्षे अभ्यास केल्यानंतर समोर आले की इथे मोठ्या प्रमाणात कार्बन डाय ऑक्साइड गॅस बाहेर निघतो.
> या गुहेत पृथ्वीच्या पृष्ठभागातून निघणारे विषारी द्रव्य बाहेर निघत असल्याने लोकांचा मृत्यू होतो, अशी माहिती जर्मनीतील डुइसबर्ग-एसेन विश्वविद्यालयाचे प्रोफेसर हार्डी पंफाज यांनी दिली.
> संशोधनानूसार या प्लुटो मंदिराच्या पृष्ठभागाखाली असलेल्या गुहेतून जवळपास 91 टक्के कार्बन डाय ऑक्साइड बाहेर निघतो. त्यामूळे या गॅसच्या वाफेमुळे येथील किटकांचा, पशु-पक्षांचा मृत्यू होतो.
संपूर्ण वाफेने भरलेली आहे ही जागा
> ग्रीक भूगर्भशास्त्रज्ञ स्ट्राबो यांच्यामते, ही जागा पूर्णपणे विषारी वाफेने भरलेली आहे.
> प्रयोग करण्यासाठी काही चिमण्यांना फेकले असता काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती स्ट्राबो यांनी दिली.
> इटलीचे एक तज्ज्ञ फ्रांसेस्को डी-एंड्रिया यांचे म्हणणे आहे की, या गुहेतील वातावरण अतिशय विषारी असल्याने येथे शेकडो पक्षी मरण पावले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.