आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या अपयशी लग्नानंतर पुन्हा लग्न थाटणार नव्हती ही अॅक्ट्रेस, 26 वर्षांपूर्वी एका पार्टीत भेटलेल्या व्यक्तीने बदलले आयुष्य

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 90's च्या दशकात 'श्रीमान श्रीमती' या मालिकेत प्रेमा शालिनी उर्फ अर्चना पुरण सिंहचा आज वाढदिवस असून तिने वयाची 56 वर्षे पूर्ण केली आहेत. 26 सप्टेंबर 1962 रोजी उत्तराखंडच्या डेहरादून येथे जन्मलेली अर्चना टीव्ही प्रेझेंटर आणि बॉलिवूड चित्रपटांव्यतिरिक्त कॉमेडीसाठी ओळखली जाते. टीव्हीवर ती 'कॉमेडी सर्कस' हा शो जज करताना दिसली होती. याशिवाय तिने 'बाज' आणि 'जज मुजरिम' या चित्रपटांमध्ये आयटम नंबरही केला आहे. 1990 साली आलेल्या 'आग का गोला' या चित्रपटात सनी देओलसोबत लिप लॉक सीन देऊन अर्चना चर्चेत आली होती. याशिवाय तिने 'रात के गुनाह' या बी-ग्रेड चित्रपटातही काम केले होते. टीव्ही इंडस्ट्रीतील चर्चित कपल असलेले अर्चना पुरण सिंह आणि परमीत सेठी यांची लव्ह स्टोरी अतिशय रंजक आहे. अर्चनाचे पहिले लग्न अपयशी ठरले होते. पहिल्या लग्नात आलेल्या अपयशानंतर अर्चनाने पुन्हा कधीही लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता. पण जेव्हा परमीत सेठीसोबत तिची भेट झाली तेव्हा परमीतमध्ये तिला केअरिंग आणि प्रेम करणारी व्यक्ती दिसली. येथून त्यांची लव्ह स्टोरी सुरु झाली. 


अर्चनाला दररोज तीन गुलाब देऊन प्रपोज करायचे परमीत...

- दोघांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून एका पार्टीत झाली होती. सुरुवातीला झालेल्या मैत्रीचे रुपांतर नंतर प्रेमात झाले.  
- जेव्हा दोघे एकमेकांना डेट करत होते, तेव्हा परमीत दररोज अर्चनाला प्रपोज करण्यासाठी तीन गुलाब घेऊन जायचे आणि तिच्याकडे आपल्या प्रेमाची कबुली द्यायचे.
- लग्नापूर्वी दोघे चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिले होते. दोघांचेही कुटुंबीय या नात्यामुळे खुश नव्हते. मीडिया आणि इंडस्ट्रीतील लोकांमध्ये या दोघांच्या नात्यावरुन गॉसिप चालायचे. अखेर सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत दोघांनी  30 जून 1992 रोजी लग्न थाटले.
- परमीत सांगतात, सुरुवातीला त्यांचे एकतर्फी प्रेम होते. ते अर्चनाच्या सौंदर्य, स्वभाव आणि नात्यातील पारदर्शकता या गुणांवर भाळले होते. हळूहळू अर्चनाही त्यांना पसंत करु लागली.
- अर्चना सांगते, परमीतचे कुटुंबीय मला पसंत करत नाहीत, हे मला चांगलेच ठाऊक होते. पण परमीत कायम माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे मी कधीही स्वतःला असुरक्षित समजले नाही. नंतर परमीतची आई मला पसंत करु लागली. परमीत आणि अर्चना यांना दोन मुले आहेत.

 

या जाहिरातीनंतर लोकप्रिय झाली अर्चना... 
- मुंबईत अर्चनाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात अनेक जाहिरातींमध्ये काम केले. पण तिला खरी लोकप्रियता निर्माते जलाल आगा यांच्या 'बँड ऐड' या जाहितीतून मिळाली.
- या जाहिरातीनंतर लोकांनी तिचे अभिनय कौशल्य ओळखले आणि तिला 'मिस्टर अँड मिसेज' या टीव्ही मालिकेत भूमिका मिळाली. 
- 1985 मध्ये आलेली दिग्दर्शक पंकज पाराशर यांची 'करमचंद' ही मालिका अर्चनाच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरली. त्यानंतर तिने अनेक मालिका, शोजमध्ये अभिनेत्री आणि प्रेझेंटर म्हणून काम केले. इतकेच नाही तर अनेक शोजमध्ये ती जज म्हणूनही झळकली.
- अर्चनाने सौदागर (1991), शोला और शबनम (1992), आशिक आवारा (1993), राजा हिंदुस्तानी (1996), कुछ-कुछ होता है (1998), मोहब्बतें (2000), मस्ती (2004), कृष (2006), ओए लकी लकी ओए (2008), दे दनादन (2009), बोल बच्चन (2012), किक (2014) आणि डॉली की डोली (2015) यासह अनेक चित्रपटांत काम केले.


छोट्या पडद्यावर मिळाले यश...
- अर्चनाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. पण लीड अॅक्ट्रेस म्हणून तिला फारसे यश मिळाले नाही. त्यामुळे 1993 मध्ये आलेल्या 'वाह, क्या सीन है' मालिकेद्वारे तिने छोट्या पडद्यावर पदार्पण केले. ही मालिका हिट ठरली होती.
- 'जाने भी दो पारो', 'श्रीमान श्रीमती', 'अर्चना टॉकीज' हे तिचे गाजलेले टीव्ही शोज आहेत. 2005 मध्ये 'नच बलिए' या डान्स रिअॅलिटी शोमध्ये अर्चना पती परमीत सेठीसोबत झळकली होती.
- 2006 मध्ये तिने 'झलक दिखला जा' हा शो होस्ट केला. त्याचवर्षी ती सोनी वाहिनीवरील 'कॉमेडी सर्कस' या कॉमेडी शोची जज बनली. शोमधील अर्चनाचा हसण्याचा अंदाज लोकांना पसंत पडला होता.  

 

बातम्या आणखी आहेत...