आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नवी दिल्ली - अमरावती येथील प्रवीण जाधव या तिरंदाजाने नेदरलँडची राजधानी अॅमस्टरडॅम जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावून रविवारी पित्याला फादर्स डेची भेट दिली. प्रवीणची आई संगीता व वडील रमेश सातारा जिल्ह्यातील सरडे गावचे असून ते मजुरी करतात. रोजगार हमीपासून इतरांच्या शेतात मजुरी करून ते उदरनिर्वाह चालवतात.
प्रवीणला नेदरलँडमधील स्पर्धेत ितघांच्या टीम इव्हेंटमध्ये रौप्य मिळाले. प्रवीणच्या संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केला असून यासोबत त्यास ऑलिम्पिक कोटाही मिळाला आहे. प्रवीण दोन महिन्यांपूर्वी लष्करात दाखल झाला असून तेथे तिरंदाजी अकादमीतच तो सराव करतो. प्रवीणच्या यशाची ही बातमी त्याचे वर्गशिक्षक विकास भुजबळ व प्रशिक्षक प्रफुल्ल डांगे यांनी त्याच्या माता-पित्याला दिली. मात्र, या स्पर्धा व ऑलिम्पिक कोटा काय असतो, याची माता-पित्याला फार माहिती नाही.
बालपणापासून आवड : प्रवीणचे शिक्षक भुजबळ म्हणालेे, शाळेत प्रवीणला धावण्याची आवड पाहून क्रीडा अकादमीत प्रवेश देण्यास प्रयत्न सुरू केले. प्रारंभी अमरावतीच्या क्रीडा प्रबोधिनीत, नंतर बालेवाडी केंद्रात प्रवेश मिळाला. तिथे तिरंदाजीसाठी निवड झाली. यातून त्याने शिक्षक व प्रशिक्षकांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवला. सुनील ठाकरे व प्रफुल्ल डांगेंनी प्रवीणला प्रशिक्षण दिले.
> सात वेळा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व.
> नेदरलँडमध्ये प्रथमच जागतिक स्पर्धेत सहभाग.
> दोन वेळा आशिया कप स्पर्धेत प्रतिनिधित्व.
> २०१६ मध्ये बँकॉकमध्ये आशिया कपमध्ये कांस्य.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.