आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुले आतापासूनच लक्ष्मणरेषा ओलांडत आहेत का?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकदा माझे आई-वडील मला खूप रागावले. त्या दिवशी आमच्याकडे पाहुणे आले हाेते आणि ते गेल्यावर त्यांच्याबाबतीत मी काहीतरी वाईट बाेललाे. त्यावर माझी आई सांत्वन करणारे पण मनाला टाेचणारे एक वाक्य म्हणाली की, अशा गाेष्टी करण्यासाठी तू अजून खूप लहान आहेस, त्यातूनही तुला त्याबाबतीत काहीही माहिती नाही. आणि वडील कडक शब्दांत म्हणाले, आपल्या येथे फळ जरा जास्तच पिकले आहे, आपले ताेंड बंद कर आणि खेळायला जा. वडिलांचा असा आेरडा एेकल्यानंतर आई मला समजवायची की कुणाला बघून केलेले काेणतेही विधान तुला एक जजमेंटल व्यक्ती बनवेल व तुझ्यातील धैर्य कमी करेल. हेच धैर्य आपल्या आयुष्यात जिंकण्याचे एक भक्कम अस्त्र असते. ती काय म्हणते हे मला कळत नव्हते. पण तिचे केसातून हात फिरवणे, गालाचे चुंबन घेणे आणि पाठ ‌थप‌थपवणे मला आनंद द्यायचे. मग हळूहळू मी लाेकांकडे लक्षपूर्वक पाहताना आलेले माझे अनुभव मी केवळ आईलाच सांगू लागलाे आणि तीदेखील त्यावर स्वत:चे मत सांगायची. यातून माझे असे व्यक्तिमत्त्व घडण्यास मदत झाली, जे प्रत्येक परिस्थिती आणि प्रत्येक गाेष्टीकडे सगळ्या बाजूंनी बघते. मी जेव्हा इन्स्टाग्राम, फेसबुकसारख्या समाज माध्यमांवर अनेक कन्फेशनची पाने बघताना तिथे १३ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आपली मते मांडतात. त्यासाेबत त्यांच्या शाळेचेही नाव असते. पेजवर या मुलांचे विचार प्रत्येकजण जाणू शकताे. कन्फेशन पेज बऱ्याच काळापासून सुरू आहे. कळत नकळत झालेली आपली चूक कबूल करणाऱ्या लाेकांसाठी हे पेज असते. परंतु तुम्ही या समाज माध्यमांवर आजच्या आधुनिक कन्फेशन वाचल्या तर तुम्हाला धक्का बसू शकताे. इथे मी बिना नावाने असेच काही कन्फेशन लिहीत आहे. ज्यात भाषेत थाेडी सुधारणा केली आहे. - ‘एबीसी आज जगातील सगळ्यात हाॅट मुलगी आहे. ती ‘ईएफजी’ बराेबर डेटिंग करत आहे. प्लीज, फक्त माझी हाे ‘एबीसी’. आणि एका दुसऱ्या कन्फेशनमध्ये एक मुलगा एका मुलीबाबत लिहिताे - ‘एक्सवायझेड नवीन आहे, पण तिला वाटते की आपण हाॅट आहाेत, कुणीतरी तिला सांगा की जरा जमिनीवर ये. जर तुम्हाला वाटत असेल की अशा पेजवर मुलांच्या शाळांची नावे आणि फक्त आपल्या मित्र-मैत्रिणींच्याच बाबतीत मते असतात तर तुम्ही चुकलात. येथे त्यांचे शिक्षक व त्यांच्या पेहरावावरही टिप्पणी केली जाते. आपल्या शिक्षकांनी शाळेत काेणता पेहराव करून यावे हे बारा-तेरा वर्षांच्या मुलांनी सांगावे ही हैराण करणारी गाेष्ट आहे. काही शाळांचे प्रशासक म्हणतात की अशा प्रकारच्या कन्फेशन पाेस्ट या आपल्या एखाद्या शत्रूची मस्करी करण्याची एक नवी पद्धत आहे. अशी मुले शाळेत आपल्या भावना व्यक्त करत नाहीत, पण त्यांच्या मनातील धूर्तपणा ते अशा पेजवर व्यक्त करतात जे सगळे जण वाचू शकतात. अशा प्रकारच्या पेजवर शाळांकडून कारवाई हाेत असून त्यासाठी सायबर सेलची मदत घेतली आहे. सायबर सेलच्या कार्यशाळेत समाज माध्यमांवर काेणतीही गाेष्ट पाेस्ट करताना खूप सावधानता बाळगली पाहिजे. कारण माहिती तंत्रज्ञान कायद्यात असे अनेक कायदे आहेत जे वादग्रस्त पाेस्टसाठी त्यांना संकटात टाकू शकतात, असे समजावले जाते. 

फंडा असा : तंत्रज्ञानाच्या पसाऱ्यामध्ये मुलांना सांभाळण्याचा चांगला मार्ग म्हणजे इतक्या कमी वयात प्रत्येक गाेष्ट व्यक्तिगत घेऊ नका, असे समजावून सांगितले पाहिजे.