Health News / उपाय/ डासांचा त्रास होतोय? हे तीन घरगुती उपाय करा आणि डासांपासून सुटका मिळवा


कापरात मिसळलेल्या लिबांच्या तेलाचा दीवा लावा

दिव्य मराठी वेब

Aug 05,2019 02:28:07 PM IST

हेल्थ डेस्क- पावसाळ्यात प्रत्येकाला डासांचा त्रास होतो. यामुळे पावसाळ्यात अनेक आजारं जडतात. अशातच डासांपासून वाचण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. डासांपासून होणारे आजार काहीवेळा जीवावर बेतू शकतात, त्यामुळे डासांपासून वाचणे गरजेचे आहे.


जर तुमच्या घरात कॉइल, मॅट किंवा मॉसकीटो लिक्विड नसेल, तर हे तीन घरगुती उपाय तुमच्या कामी येईल.

> झोपताना कापुरात मिसळलेल्या लिंबाच्या तेलाचा दिवा लावा, यामुळे डास तुम्या जवळ येणार नाहीत.

> सगळ्यात आधी लिंबाच्या तेलात कापुर मिसळून त्याला एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. आता या मिश्रणाला तमालपत्रावर स्प्रे करुन तमालपत्र जाळा. याच्या धुरामुळे सगळे डास पऴून जातील.

> नारळाचे तेल, लिंबाचे तेल, लवंगाचे तेल, पेपरमिंट तेल आणि नीलगिरीचे तेल यांना समान मात्रेत मिसळून घ्या. रात्री झोपताना आपल्या त्वचेवर लावा, डास चावणार नाहीत.

X
COMMENT